कोल्हापूर

बिद्री कारखान्यावरील कारवाई योग्यच ः सरपंच पाटील

CD

बिद्री कारखान्यावरील कारवाई
योग्यच ः सरपंच पाटील

सकाळ वृत्तसेवा
कसबा वाळवे, ता. २ ः बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कारखान्यात मनमानी कारभार करून ६५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे उत्पादन शुल्क खात्याने कारखान्यावर केलेली कारवाई योग्यच असल्याचा आरोप चंद्रे (ता. राधानगरी) येथील सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
उत्पादन शुल्क खात्याने कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाची तपासणी केली. त्यात त्रुटी असल्याने प्रकल्पाचा परवाना निलंबित केला. या निर्णयावरून शेतकऱ्यांतून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच अनुषंगाने चंद्रेचे सरपंच पाटील यांनी के. पी. पाटील यांच्यावर घणाघती आरोप करत ही कारवाई शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे सांगितले.
सरपंच पाटील म्हणाले, ‘डिस्टीलरी प्रकल्पासाठी अनुभव नसलेले अधिकारी नेमले. शासनाच्या इरादा पत्राविना ८० टक्के काम पूर्ण केले, काही बाबी मुद्दाम लपवल्या. अवेळी मोलॅसीस भरल्याने मोलॅसीस व मळीच्या साठ्यामध्ये तफावत आढळली. त्यामुळे शासनाचा सुमारे १० कोटींचा महसूल बुडाला,. मंजूरपेक्षा जास्त मद्यार्क साठा करून उत्पादन शुल्क खात्यालाच फसवले. अनेक त्रुटीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना रिकव्हरी दरापेक्षा जादा दर कधीच दिलेला नाही. नोकर भरतीची जाहिरात इंग्रजी वृत्तपत्रात देऊन सभासदांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवले. उत्पादन शुल्कच्या कारवाईवर कोणताही खुलासा न करता ते राजकीय वळण देत आहेत. त्यामुळे कारवाई योग्य असून अधिक चौकशी करावी.’
यावेळी अर्जुनवाड्याचे माजी सरपंच नामदेव चौगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT