कोल्हापूर

भाचरवाडी रस्त्याचे काम पूर्ण

CD

00722
भाचरवाडी रस्त्याचे काम पूर्ण
दै.‘सकाळ’चा पाठपुरावा; वाहनधारकांत समाधान

सकाळ वृत्तसेवा

कोतोली ता. ११ : भाचरवाडी ते खडेखोळ (ता. पन्हाळा) दरम्यानच्या चार किलोमीटर रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. मुख्य रस्त्यावर खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दगडी गेबीन वॉलचे बांधकामही पूर्ण झाले. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळ्यात खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी मोरीही बांधली आहे. हा रस्ता वाहतुकीस पूर्ववत झाल्याने मार्गावरून प्रवास करण्याऱ्या वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पन्हाळा पश्चिम भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भाचरवाडी ते खडेखोळ रस्ता होय. १५ वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे पहिल्यांदा काम झाल्यानंतर वाहतूक वाढली होती. कालांतराने रस्ता खराब झाल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. याबाबत दै.‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्यानंतर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्त्यासाठी १ कोटी ७० लाख रुपये आणि खचलेल्या रस्त्यासाठी २५ लाख निधी मंजूर होता. काही दिवसांपूर्वी खडीकरण, डांबरीकरणाचे काम सुरू झाले होते. येथील काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीस सुरळीत झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कोट -
भाचरवाडी-खडेखोळ रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने त्रास कमी झाला आहे.
- पांडुरंग गांजवे, कोतोली, वाहनधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT