कोल्हापूर

आळवेकरांची लालपरीची प्रतीक्षा संपली

CD

00930
आळवेत लालपरीची प्रतीक्षा संपली
एसटी बससेवा सुरू; कोरोना काळापासून होती बंद

कोतोली; ता. ४ : आळवे (ता. पन्हाळा) गावाला कोरोना काळापासून बंद असलेली एसटी बस सेवा गुरुवार (ता. ३) पासून सुरू झाली असून गाववाल्यांची लालपरीची प्रतीक्षा संपली. येथील राजकुमार चौगले आणि अजित कुंभार यांनी आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांना बंद असलेली बस सेवा सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबतचे वृत्त दै. ‘सकाळ’मधून सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झाले होते.
त्या अनुषंगाने आमदार सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि एसटी महामंडळाचे आगारप्रमुख अनिल मेहत्तर, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांच्या सहकार्याने बससेवा सुरू झाली. आलेल्या बसचे स्वागत माजी सरपंच शिवाजी गायकवाड यांनी केले. यावेळी चालक जयवंत कांबळे आणि वाहक सरदार गायकवाड यांचा सत्कार राजकुमार चौगले व अजित कुंभार यांनी केला.
यावेळी संजय बंगे, शिवाजी बंगे, बळवंत गायकवाड, शंकर गायकवाड, आनंदा लाड, माजी सैनिक शिवाजी पाटील, सरदार पाटील, युवराज गायकवाड, लहू खाडे, विलास पाटील, सुभाष गायकवाड, तानाजी पाटील, विनोद गुरव, संभाजी लाड, अनिल गायकवाड, संभाजी खामकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT