कोल्हापूर

श्रम आणि संस्कारामुळे विद्यार्थी सुसंस्कृत होतात : डॉ. जे. के. पवार

CD

01186

श्रम, संस्कारांमुळे विद्यार्थी
सुसंस्कृत होतात : डॉ. पवार

श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता

सकाळ वृत्तसेवा

कोतोली ता. ४ : ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडते. त्यामुळे विशेष श्रमसंस्कार शिबिरातील श्रम आणि संस्कारांमुळे विद्यार्थी सुसंस्कृत होतात. ग्रामीण भागातील श्रमाचा व संस्काराचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये मोठा उपयोग होतो,'' असे प्रतिपादन ‘अर्थायन’कार व शाहू अध्यासन कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. के. पवार यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नांदगाव (ता. शाहूवाडी) येथे आयोजित केलेल्या सातदिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विक्रम महिपती गुरव होते. डॉ. एम. के. कांबळे यांनी प्रास्ताविक, स्वागत केले. पाहुण्यांची ओळख प्रा. एच. एस. शिरसट यांनी करुन दिली. डॉ. उमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, उपाध्यक्ष प्रा. जी. टी. पाटील, संचालक कल्पनाताई चौगुले, डॉ. अजय चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. उषा पवार, प्रा. शीतल चौगुले, गजानन शिंदे, सरपंच गीता गुरव, उपसरपंच अरुण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, पोलिसपाटील सुजाता पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीपतराव गुरव, ग्रामसेवक सागर निकम, मुख्याध्यापक अशोक पाटील उपस्थित होते. प्रा. जगदिश सरदेसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT