कोल्हापूर

कोतोलीची हनुमान यात्रा उत्साहात संपन्न

CD

01966

कोतोलीची हनुमान यात्रा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

कोतोली ता. २७ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रा अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारी होत असते. ही यात्रा शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) उत्साहात झाली.
शनिवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रामदैवत हनुमान मूर्तीस अभिषेक घालुन त्यानंतर काकड आरती करण्यात आली. यात्रेच्या या मुख्य दिवशी दिवसभर हजारो भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती. माजी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच अजित पाटील, प्रशांत पाटील, महादेव पाटील, अजित कांबळे, संदीप चौगुले आणि मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी महाआरती करण्यात आली. महाआरतीवेळी मंदिरात गर्दी झाली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सुभाष पाटील, सरदार पाटील, सज्जन पाटील, अरुण पाटील, शंकर पाटील, सागर वरपे, संतोष सूर्यवंशी, बाबासो साळोखे, मुख्य पुजारी रामानंद गुरव, संजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा झाला.
हनुमानाचे विग्रह आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान करून पालखी मरगाईच्या भेटीसाठी पारंपरिक वाद्यांच्या गजरात नेण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात फटाक्यांची आताषबाजी केल्याने आसमंत उजळून निघाला. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. दरम्यान तरुण मंडळांच्या युवकांनी काढलेल्या मिरवणुका पाहण्यासाठी रात्री नऊपर्यंत हजारो नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Deal : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला झटका ! अमेरिका-इराण अंतिम करार आता 'या' देशात होणार

Pune Railway: कन्फर्म तिकीट मिळणे कठीण! पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी; तत्काळ कोटा काही सेकंदातच ‘हाउसफुल्ल’

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

रजोनिवृत्ती

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठाच्या भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार

SCROLL FOR NEXT