कोल्हापूर

कुंभोजला हिवरखान बिरदेव यात्रेची उत्‍साहात सांगता

CD

05474
कुंभोज : येथील हिवरखान बिरदेव यात्रेनिमित्त काढण्‍यात आलेल्या पालखी मिरवणुकीत सहभागी भाविक.

हिवरखान बिरदेव यात्रेची
कुंभोजला उत्‍साहात सांगता
‘बिरोबाच्‍या नावनं चांगभलं’चा गजर
सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. १३ : ‘बिरोबाच्‍या नावनं चांगभलं’चा तीन दिवस झालेला गजर, अमाप उत्‍साह आणि भक्‍तिमय वातावरणात येथील हिवरखान बिरदेव जळाची परडी यात्रेची सांगता झाली.’
कुंभोज-कवठेसार रस्‍त्‍यावर केंद्रीय प्राथमिक शाळेलगत बिरदेव मंदिर आहे. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सकाळी मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने पालखी देवमाळी गेली. ढोलांचा गजर, भंडाऱ्याची उधळण, आतषबाजी आणि उत्‍स्‍फूर्त गर्दी असे भक्‍तिमय वातावरण होते. गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मंदिरात आली. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यात्रेस सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्‍कार करण्‍यात आला. दुपारी विधीवत यात्रेची सांगता करण्‍यात आली. यात्रा काळात माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, बाबासाहेब पाटील, डी. सी. पाटील, अरुण पाटील, राहुल आवाडे, प्रवीण यादव, अशोकराव माने, बाबासाहेब चौगुले, किरण माळी, संदीप कारंडे आदींनी उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT