कोल्हापूर

बाजूपट्टी खचल्याने गाडी घसरली

CD

05479
कुंभोज : येथील बाजूपट्टी खचल्‍यामुळे कोळी मळ्‍याजवळ घसरलेली गाडी जेसीबीने काढली.
------
बाजूपट्टी खचल्याने गाडी घसरली
कुंभोज-हातकणंगले मार्ग : डागडुजी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. १५ : कुंभोज-हातकणंगले मार्गावर येथील कोळी मळ्याजवळ आरएमसी (तयार क्राँक्रिट) वाहतूक करणारी गाडी घसरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली. जेसीबी यंत्राच्‍या सहायाने गाडी काढली.
दोन-चार महिन्यांपूर्वी कुंभोज ते मजले रस्त्याच्या बाजूपट्टीतून मजलेसाठी जलजीवन योजनेची पाईपलाईन टाकली आहे. वळवामुळे बाजूपट्टी खचली आहे. हातकणंगलेहून कुंभोजकडे आरएमसी वाहतूक करणारी गाडी कोळी मळ्‍याजवळ आली असता बाजूपट्टीत घसरली. ती जेसीबीच्या सहायाने बाहेर काढली. काही दिवसांपूर्वी नेजजवळ शाळेची बसही याच रस्त्याच्या बाजूपट्टीवरून घसरली होती.
दरम्‍यान, येथील मुख्‍य बसस्‍थानक परिसरात डांबरी रस्‍ता खोदाई करून तीन-चार महिन्ं‍यापूर्वी ही पाईपलाईन नेली आहे. मात्र, अद्याप रस्‍त्‍याची डागडुजी केलेली नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्‍त्‍याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
-----------
डांबरी रस्‍ता खोदाई करून मजलेसाठी जलजीवन योजनेतून पाईपलाईन मजले गावी नेली आहे. रस्‍त्‍याची डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.
- संजय पाटील, ठेकेदार
-------
ठेकदाराने ते काम करावे. नाही केले तर सार्वजनिक बांधकाम विभाग ते काम आमच्‍याकडे असणाऱ्या डिपॉझिटमधून करणार, त्‍यासाठी तांत्रिक बाबींना अवधी लागतो.
- शिवाजी पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हातकणंगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT