कोल्हापूर

मंडलिक साखर कारखाना निवडणूक २१ जागासाठी ५८ उमेदवारी अर्ज सर्व अर्ज खासदार मंडलिक गटाचे : बिनविरोधचा मार्ग मोकळा : छाननी व माघारीची औपचारिकता

CD

मंडलिक कारखान्यासाठी
५८ उमेदवारी अर्ज दाखल

सर्व अर्ज खासदार मंडलिक गटाचे : बिनविरोधचा मार्ग मोकळा

म्हाकवे,ता २६: लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज ३९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. १९ जणांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी एकूण ५८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. २९ मे ला अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान, विरोधकांनी अर्ज दाखल केले नसल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उत्पादक गटातून ३८, संस्था गटातून २, अनुसूचित जाती जमाती मधून २, महिला गटातून ९, इतर मागास गटातून ५ , भटक्या विमुक्त गटातून २, अशा एकूण ५८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये आजी- माजी संचालक, संचालिका, तसेच काही नव्या चेहऱ्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. आता लक्ष उमेदवारी छाननी व माघारीकडे लागले असून संचालकपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे .
मुरगूड, बोरवडे, कागल, मौजे सांगाव, सेनापती कापशी अशा ५ उत्पादक गटातून प्रत्येकी ३ या प्रमाणे १५ संचालक तसेच इतर मागास वर्गातून १ , भटक्या विमुक्त गटातून १ , महिला गटातून २ व संस्था गटातून १ असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत.
प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे सहाय्यक निबंधक संभाजी पाटील, ए.पी.खामकर, अमर शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT