कोल्हापूर

प्रज्ञाशोध परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणार रोख पारितोषिक : एक लाख ४८ हजार रुपये वर्ग : मराठी माध्यमातील २२५ विद्यार्थ्यांना लाभ

CD

प्रज्ञाशोध परिक्षेतील यशस्वी
विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक

एक लाख ४८ हजार रुपये वर्ग; मराठी माध्यमातील २२५ विद्यार्थ्यांना लाभ

म्हाकवे, ता. ३० : कोल्हापूर जिल्हा परिषदेने २०२२-२३ मध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेतली होती. उर्दू व मराठी माध्यमातील मुलांसाठी घेतलेल्या या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यासाठी एक लाख ४८ हजार रुपयांची रक्कम जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वर्ग केली आहे. यामध्ये मराठी माध्यमातील २२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
इयत्ता चौथी व सातवीसाठी ही प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हास्तरावर मराठी माध्यमातील चौथीच्या ११३ विद्यार्थ्यांना तर सातवीच्या ११२ विद्यार्थ्यांची निवड रोख पारितोषिकसाठी करण्यात आली आहे. तालुकानिहाय चौथी व सातवी पारितोषिक रक्कम व कंसात विद्यार्थी संख्या (मराठी) अशी कागल- १२,५०० रु. (४६), गगनबावडा-६०० रु. (१), भुदरगड -१०,००० रु. (२९), चंदगड-१३,००० रु. (२३), गडहिंग्लज -७००० रु. (३), हातकणंगले -१४,००० रु. (५), आजरा १२,५०० रु. (९), करवीर- ६००० रु. (२७), पन्हाळा-८००० रु. (१०), राधानगरी- १५,००० रु. (४३), शाहूवाडी-८००० रु. (१३), शिरोळ-१८,५०० रु. (१६).---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT