एकोणीस हजार हेक्टरवर
कागलमध्ये होणार पेरणी
ऊस क्षेत्रात १५ टक्के घट; मशागतीच्या कामांना व्यस्त
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. २१ : कागल तालुक्यात सुमारे १९ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. तालुक्यात यावर्षी ऊसक्षेत्रात सरासरी १५ टक्के घट झाली आहे. खरीप हंगामासाठी भात (६ हजार ५०० हेक्टर), सोयाबीन (७ हजार ८०० हेक्टर), भुईमूग (२५०० हेक्टर), ज्वारी (२५० हेक्टर), भाजीपाला, तूरडाळ, उडीद व इतर कडधान्ये (२६००) असे सुमारे १९ हजार १०० हेक्टर खरीप क्षेत्र आहे.
वळीव पावसाच्या हजेरीने शेतशिवारात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यासाठी शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतकरी बैलांच्या सह्याने तसेच ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरच्या सहाय्याने नांगरणी करणे, बांधबंदिस्ती करणे, शेणखत, जमीन स्वच्छ करण्याच्या कामात व्यस्त आहे.
तालुक्यातील डोंगरी भागातील जमीन क्षेत्रावरील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, तर नदीलगतच्या जमीन क्षेत्रातील मशागतीची कामे अद्यापही सुरू आहेत. सध्या कृषी सेवा केंद्रांमध्ये भात, सोयाबीन बियाणे उपलब्ध झाली असून, बळिराजा खरेदी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.