कोल्हापूर

संजय घाटगेंच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान देणार

CD

5699
केनवडे ः येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना संजय घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ. समोर उपस्थित जनमुदाय.
....
संजय घाटगेंच्या कार्यकर्त्यांना
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार

मुश्रीफ : केनवडेत ‘अन्नपूर्णा शुगर’वर शेतकरी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता.३ : ‘विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधीच संजय घाटगे यांनी मला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे लढण्यासाठी मला दहा हत्तीचे बळ मिळाले. त्यांच्या कार्यकर्त्यांना मानसन्मानाबरोबरच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. विचार आणि प्रवृत्तीविरोधात ही निवडणूक असून, जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही दोघे एकत्रच राहणार आहोत,’ असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले
केनवडे (ता. कागल) येथे अन्नपूर्णा शुगर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय घाटगे होते. यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, अरुण इंगवले, दताजीराव घाटगे, राहुल देसाई, विकास पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते. यावेळी संजय घाटगे यांची जिल्हा बॅंकेवर तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
संजय घाटगे म्हणाले, ‘इतर नेते स्वतःसाठी जगतात. मात्र, हसन मुश्रीफ सर्वसामान्यांसाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या रूपाने आपल्याकडे मोठा तोफखाना आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोणीही असूद्या. त्यांच्यापुढे टिकाव लागणार नाही.’
अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, ‘मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कारखाना उभारणीत मोठी आर्थिक मदत केली. त्यामुळेच कारखान्याची उभारणी झाली. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव कोणी केला, हे न समजण्याइतपत आमचे कार्यकर्ते अज्ञानी नाहीत. त्यामुळे अशा प्रवृतीविरोधात आम्ही उतरलो आहोत.’
धनराज घाटगे यांनी स्वागत केले. ‌यावेळी अजित पाटील, एकनाथ नार्वेकर, बिद्रीचे संचालक राहुल देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास दत्तोपंत वालावलकर, नानासाहेब कांबळे, विष्णुपंत गायकवाड, काकासाहेब सावडकर, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील-केनवडे, अरुंधती घाटगे, सुयशा घाटगे, धनश्रीदेवी घाटगे, वीरेन घाटगे आदी उपस्थित होते. सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ‘बिद्री’चे संचालक रणजित मुडूकशिवाले यांनी आभार मानले.
.............
चौकट...
माझ्या विजयाचा घट बसविला..!
मी सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर संजय घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीतील माझ्या विजयाचा घट त्यांनी बसविला असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT