6056
साके (ता. कागल) ः येथे कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, सुयशा घाटगे, भैया माने. सोबत लसीकरणाची प्रमाणपत्रे स्वीकारलेल्या मुली. (छायाचित्र ः सागर लोहार, साके)
..............
‘साके पॅटर्न’ राज्यभर पोहोचेल
कार्तिकेयन एस. ः कॅन्सर प्रतिबंधक लसीचा ग्रामीण भागात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १२ : ‘कॅन्सरमुक्तीसाठी हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत जिल्ह्यातील ९ ते २६ वयोगटांतील अविवाहित मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणाचा ग्रामीण भागातील प्रारंभ साके येथील प्राथमिक शाळेतून झाला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व सहमती देणाऱ्या पालकांना धन्यवाद. कॅन्सर प्रतिबंधक लसीचा ‘साके पॅटर्न’ राज्यभर पोहोचेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केला.
साके (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेत हसन मुश्रीफ फाउंडेनमार्फत कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या होते. यावेळी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, मनोज फराकटे, सुयशा घाटगे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, तालुका आरोग्य अधिकारी फारुक देसाई आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शाळेतील ८० व माध्यमिक शाळेतील २० मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देऊन प्रमाणपत्रांचे वाटप केले.
भैय्या माने म्हणाले, ‘जिल्ह्यातील अडीच लाख मुलींना कॅन्सर प्रतिबंधक मोफत लस देण्याचे शिवधनुष्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत उचलले आहे.’
बाळासाहेब तुरंबे म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेली ३५ वर्षे नागरिकांची आरोग्यसेवा केली आहे. आता मुलींसाठी कॅन्सरमुक्त प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी जिल्ह्यात प्रथम साके गावाची निवड केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.’
रमेश जाधव यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक दत्तात्रय ससे यांनी प्रास्ताविक केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राधिका जोशी, शशिकांत खोत, अनिरुद्ध पिंपळे, मंगल ऐनापुरे, सरपंच अंजली कांबळे, उपसरपंच सुजय घराळ, मुख्याध्यापक भानुदास पोवार, डॉ. सागर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाजीराव पाटील, सुरेश सोनगेकर, विकास पाटील, आरोग्य सेवक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश मगदूम यांनी आभार मानले.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.