कोल्हापूर

चार हजार मोफत साड्यांचे वाटप

CD

चार हजार मोफत साड्यांचे वाटप

अंत्योदय योजनेतील कागलमधील महिलांना लाभ : होळीनिमित्त शासनाची भेट

रमेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १४ : होळी सणानिमित्त शासनाने अंत्योदय योजनेतील महिलांना मोफत साड्या देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कागल तालुक्यातील अंत्योदय योजनेतील ३ हजार ९६५ महिलांना या मोफत साड्यांचे वितरण सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून करण्यात आले.‌
महिलांना यापूर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आता पुन्हा मोफत साडी दिल्याने महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे. अंत्योदयप्रमाणेच प्राधान्य कुटुंबातील महिलांना मोफत साडी योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी महिलावर्गातून होत आहे.
राज्य सरकारकडून रेशन धान्य दुकानातून अन्नधान्य तसेच वर्षातून एकदा सणानिमित्त साड्या देण्याचा निर्णय घेतला होता. आता होळी सणानिमित्त साड्यांचे वाटप रेशन दुकानातून करण्यात येत आहे‌. याबाबत गावागावांतून कार्ड आणि साड्यांची संख्या किती याची माहिती रेशन धान्य दुकानदारांकडून पुरवठा विभागाने घेतलेली होती.
कागल तालुक्यात ३ हजार ९६५ अंत्योदय योजनेतील कुटुंबाची संख्या आहे. गोदाम विभागात या साड्या आल्या असून, त्यांचे वाटप रेशन धान्य दुकानदारांना होत आहे. यापूर्वी रेशन धान्य दुकानातून गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती व दिवाळी सणानिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये प्रत्येक महिलेला दिले जात आहेत, तर आता अंत्योदय योजनेतील महिलांना मोफत साडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
....
कोट...
कागल तालुक्यामधील अंत्योदय योजनेमधील महिलांसाठी होळी सणानिमित्त मोफत साड्या प्राप्त झाल्या आहेत. गावागावांतील रेशन धान्य दुकानदारांकडे या साड्या देण्याचे काम सुरू आहे. धान्यासोबत मोफत साड्या महिलांना देण्यात येणार आहेत.
- सुलोचना तोडसाम, पुरवठा निरीक्षक, कागल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT