6335
सावर्डे खुर्द (ता. कागल) : येथील हनुमान व महादेव मंदिरांचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
..........
सावर्डेत हनुमान, महादेव मंदिरांचा
वास्तुशांती, कलशारोहण सोहळा
कलश मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ११ : सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील श्री हनुमान व श्री महादेव मंदिरांचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी दिलेला निधी तसेच ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या मंदिरांची उभारणी झाली आहे.
मंदिरांच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांनी गावात विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये कलशाची गावातून मिरवणूक, होमहवन, यज्ञ, पूजा, कलशारोहण, मंदिर लोकार्पण व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘परमेश्वराने शेकडो मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धाराचे काम माझ्या हातून करवून घेतले हे माझे परमभाग्यच आहे. त्यामुळेच माझे जीवन कृतार्थ आणि आनंदी आहे. आजतागायत मी लोकभावनेनुसार काम करीत आलो आहे. देवदेवतांच्या आशीर्वादाच्या पुण्याईची कवचकुंडले माझ्याभोवती आहेत. मंदिर उभारणीत ग्रामस्थांसह विशेषत: माहेरवाशिणींनीही मोठ्या भक्तिभावाने या मंदिरासाठी मोठे योगदान दिले आहे.’
यावेळी आनंदा डाफळे, उत्तम डाफळे, प्रशांत डाफळे, बाबूराव मालवेकर, आनंदा उबाळे, रंगराव कांबळे, महादेव तुरंबेकर, राहुल उबारे, के. एम. शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.