कोल्हापूर

मंडलिक कारखान्यातर्फे अमृताला लाखाची मदत

CD

07569

हमिदवाडा : अमृता पुजारी हिला एक लाख रुपयांची मदत करताना संजय मंडलिक. शेजारी वीरेंद्र मंडलिक, विश्‍वास कुराडे, प्रकाश पाटील, आनंदा फराकटे व अन्य. (छायाचित्र : जे. के. फोटो, सुरुपली)


सदाशिवराव मंडलिक कारखान्यातर्फे
कुस्तीपटू अमृताला लाखाची मदत
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १९ : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती संकुलातून घडलेल्या मल्लांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेल्या यशाची दखल घेत मंडलिक कारखान्याने गुणवंत मल्ल व प्रशिक्षकांना आर्थिक पाठबळ दिले. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या दुहेरी महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी हिला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विविध स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मल्लांसह प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
हमिदवाडा (ता. कागल) येथील मंडलिक साखर कारखान्यातर्फे गुणवंत मल्लांना दीड लाख रुपयांची मदत कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष विश्वास कुराडे, आर. डी. पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
प्रा. मंडलिक म्हणाले, ‘कारखान्याच्या २७ हजार सभासदांचा आशीर्वाद या मल्लांसोबत आहे. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जागतिक कुस्ती स्पर्धेत ते यशस्वी होतील.’ नंदिनी साळोखे, पंकज चौगले, सिद्धेश पाटील, राजू अवघडे, हर्षद पाटील, पवन मेटकर, दयानंद खतकर यांचाही यावेळी सत्कार झाला.
दरम्यान, अमृता पुजारी हिला एक लाख रुपये, युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविलेल्या तृप्ती मगदूम व भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवानंद माळी, शेखर सावंत, भगवान पाटील, राज कांबळे, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, संचालक उपस्थित होते. सेक्रेटरी सुदाम देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT