कोल्हापूर

उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान

CD

उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान

माजगाव : उत्रे (ता. पन्हाळा) येथील डोंगराळ भागात निकमवाडी उदाळवाडी परिसरातील ‘वांजुळे दरा’ नावाच्या शेतात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गव्यांनी ऊस, मक्का, भुईमूग, सूर्यफूल, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गव्यांपासून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वनखात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात दिवसाही गव्यांचा वावर वाढला आहे. गव्यांच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करत असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळा सुरू झाला असून, ऊस पिकासह इतर पिकांना जादा पाण्याची गरज भासत आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जात नाहीत. जीव मुठीत घेऊन शेताकडे जात आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने याबाबत उपाययोजना राबवून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar record victory : सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या ठरल्या आमदार, बारामतीचा आतापर्यंतचा निकाल घ्या जाणून

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

Assembly election results 2026 Live Update : विजय मुख्यमंत्री होणारच? पण उपमुख्यमंत्रिपदासाठी पडद्यामागे कोणाचं नाव चर्चेत?

Communist Politics Crisis : बंगाल, त्रिपुरापाठोपाठ आता केरळही हातातून निसटलं? भारतीय राजकारणातून डाव्यांचा 'द एन्ड'? 50 वर्षांत CPI (M) च्या घसरणीची धक्कादायक कहाणी

Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT