कोल्हापूर

कोतोलीची श्री.हनुमान यात्रा उत्साहात

CD

कोतोलीची हनुमान यात्रा उत्साहात
माजगाव, ता. २९ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्री हनुमान चैत्र यात्रा अक्षयतृतीयेनंतर येणाऱ्या शनिवारी प्रथेनुसार भरते. यावर्षी यात्रा मोठ्या उत्साहात झाली. मुख्य पुजारी रामानंद गुरव यांनी ग्रामदैवत हनुमानाला पहाटे दुग्धाभिषेक घालून साज-शृंगार करून सालंकृत रूपात खडी पूजा बांधली होती. सरपंच वनिता पाटील, उपसरपंच सुवर्णा पाटील, ग्रा.पं. पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, बळवंत पाटील तसेच शंकर पाटील, आर. एस. पाटील, प्रशांत पाटील, सज्जन पाटील, सागर वरपे, विश्वास पाटील, राज गंधवाले, बाबासो साळोखे यांच्या उपस्थितीत महाआरती करून यात्रेला सुरूवात झाली. शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. सायंकाळी वाजतगाजत सासनकाठी मिरवणूक व पालखी सोहळा झाला. रात्री लावण्यांचा बहारदार कार्यक्रम पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. रविवारी (ता. ३०) जेवणावळीनंतर यात्रेचा समारोप होईल.
दीड लाखाच्या कुस्तीचे आकर्षण
कोतोलीला कुस्तीची मोठी परंपरा आहे. दरवर्षी यात्रेला जंगी कुस्ती मैदान भरते. बांधकाम व्यावसायिक सोपान डी. पाटील यांनी आयोजित केलेली दीड लाखाची कुस्ती यंदा लक्षवेधी ठरेल. महाराष्र्ट नागरी, विश्वास पतसंस्था, सुवर्णबल्ली पत. तसेच जनसेवा पतसंस्थेतर्फे प्रमुख कुस्त्या आयोजित केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT