कोल्हापूर

पडळ येथील मुख्य रस्त्याची दुरवस्था

CD

04088

मुख्य रस्त्याची
पडळला दुरवस्था

खड्ड्यांत पाणी साचून रहिवाशांना त्रास

माजगाव, ता. ४  ः पन्हाळा तालुक्यातील पडळ ते माजगाव या प्रमुख मार्गावरील पडळ येथील पेठ गल्लीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामध्ये पावसाचे पाणी साचून राहते. यामुळे गल्लीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यावर वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पन्हाळ्यातील पश्चिम भागाला तालुक्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे येथून नेहमी रहदारी असते. येथून दररोज आठ ते दहा गावांतील वाहनधारक प्रवास करतात. छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे येथून वाहन चालवणे त्रासदायक ठरू लागले आहे. वाहनांचे नुकसान होते. पावसाळ्याचे दिवस आहेत. खड्ड्यात साचलेले गढूळ पाणी वाहनांच्या वेगाने गल्लीतील घरांत जात आहे. त्याचबरोबर प्रमुख बाजारपेठ असलेल्या या गल्लीतील छोट्या मोठ्या दुकानदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT