कोल्हापूर

धोकादायक ऊस वाहतूक अपघातास निमंत्रण

CD

04450

धोकादायक ऊस वाहतूक अपघातास निमंत्रण

ट्रॅक्टरचालक बेशिस्तच; कडक कारवाई करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

माजगाव, ता. ११ ः कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यावर धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न दरवर्षी ऐरणीवर येतो. यंदाही ऊसवाहतूक धोकादायक व मर्यादा ओलांडून होत असल्याचे चित्र आहे. धोकादायक वाहतुकीवर निर्बंध घालण्याची गरज आहे.
सध्या ऊस गाळप हंगामाला वेग आला आहे. हंगाम संपेपर्यंत रात्रंदिवस अनेक ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीने वाहतूक सुरू असते. मर्यादेपेक्षा अधिक ऊस वाहतूक अपघाताला निमंत्रण ठरते. विशेषतः ट्रॅक्टरमधून क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक होते. पाठीमागे अथवा बाजूला रिफ्लेक्टर, रेडियम व टेल लॅम्प नसल्याने वाहनधारकांना केवळ ट्रॅक्टर दिसतो. त्यामागील ट्रॉलीचा अंदाज येत नाही. वजन मर्यादा, रिफ्लेक्टर बसविणे यासह कोणत्याच वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. गतवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी केलेल्या जागृतीमुळे अपघातावर नियंत्रण आले. त्यानंतरही यंदा ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमालक आणि चालकांना शिस्तीचे वावडे असल्याचेच चित्र आहे. मर्यादेपेक्षा ऊस जास्त भरला जातो. रस्ता लेव्हल नसेल तर ट्रॅक्टर हेलकावे खातो. ओव्हरटेक करतांना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

चौकट
क्षमतेपेक्षा जास्त ऊस धोकादायक.....
ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मर्यादेपेक्षा अधिक ऊस भरला जातो. दोरखंड निघून उसाच्या मोळ्या लोंबत असतात. ऊस खाली पडत असतो. ऊस मोळ्या वाहनधारकांना लागून दुर्घटना घडतात. रस्त्यावर पडलेल्या उसामुळेही दुचाकी घसरतात.


साउंड बॉक्समुळे त्रास....
ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमध्ये साउंड बॉक्सवर जोरजोरात गाणी वाजवली जातात. मागून वाहन आलेले चालकाला काही समजत नाही. साउंडचा ज्येष्ठ नागरिक, बालकांना त्रास होतो. यावरून चालकाला जाब विचारला तर वादाचे प्रसंग उद्भवतात.


प्रतिक्रिया
बसपाळीमुळे आठवड्यातून फक्त ४ ते ५ खेपा होतात. कामगार ॲडव्हान्स, ड्रायव्हर पगार , डिझेल खर्च वजा करता जास्त फायदा होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस ट्रॉलीमध्ये भरतो.
- गणपती पाटील, ट्रॅक्टरचालक, माजगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT