कोल्हापूर

बांबवडे येथे चाकू हल्ला तिघे जण गंभीर जखमी

CD

दीपक हंडे 02752 (पांढरा शर्ट)
सुभाष हंडे 02750 (गळ्यात स्कार्प)
संदीप हंडे 02751

शाहूवाडीत चाकू हल्ल्यात तिघे गंभीर
चारचाकीचा धक्का लागल्यानंतर बाचाबाची; तीन जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. १५ ः चारचाकीचा धक्का लागल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत चाकू हल्ला झाल्याने तीन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. दीपक सर्जेराव हंडे, सुभाष सर्जेराव हंडे व संदीप सर्जेराव हंडे (सर्व रा. सुपात्रे) अशी जखमींची नावे आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास बांबवडे येथील पोलिस चौकीसमोर घटना घडली. या प्रकरणी प्रवीण जानकर, विशाल जाणकर व गुंगा जाणकर (सर्व रा. बांबवडे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दीपक हंडे हा शासकीय गाडीवर चालक आहे. तो गाडी आणण्यासाठी निघाला असता बांबवडे येथे पोलिस चौकीसमोर थांबला होता. त्यावेळी खासगी प्रवासी वाहतूक करणारा प्रवीण जानकर गाडी वळवत असताना दीपक यांना गाडीचा धक्का लागला. त्यावरून दीपक व प्रवीण यांच्यात बाचाबाची झाली. त्यात प्रवीण याने चिडून दीपकवर चाकू हल्ला केला. त्यात दीपकच्या पोटावर व हातावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. बाचाबाची व चाकू हल्ला झाल्याचे समजताच दीपकचे भाऊ सुभाष व संदीप हंडे व प्रवीणचा भाऊ विशाल व वडील गुंगा जानकर तेथे आले. त्यावेळी झालेल्या मारामारीत सुभाष व संदीप हंडे जखमी झाले. सुभाषला डोक्यात तर संदीपला नाकावर मार लागला. विशाल व गुंगा जानकर हेही जखमी झाले.
दीपक, सुभाष व संदीप हंडे या तिघांवर बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारसाठी कोल्हापुरला पाठवले, तर विशाल व गुंगा जानकर यांच्यावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. बांबवडे पोलिस चौकी व बस थांबा परिसरात गर्दीच्या ठिकाणीच घटना घडल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शाहूवाडी पोलिसांत घटनेची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक विजय घेरडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT