लोगो शिवजयंती उत्साहात
शाहूवाडी तालुक्यात शिवजयंतीनिमित्त
व्याख्यान, पोवड्यासह विविध कार्यक्रम
शाहूवाडी ः तालुक्यातील गावागावांत शिवजयंतीचा सोहळा उत्साहात झाला. त्यानिमित्त छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन, व्याख्यान, प्रभातफेरी, पोवाडा, साहसी खेळ, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन असे विविध कार्यक्रम आयोजित कण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त शाहूवाडी येथील भगवा चौकात व मलकापूर येथील शिवतीर्थ चौकात उत्साहात छ्त्रपतींच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर लेझीम व मर्दानी खेळ झाले. गावच्या मुख्य बाजारपेठ मार्गावरून सवाद्य फेरी काढणेत आली. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मलकापूर नगरपालिका, कोरे महिला महाविद्यालय, प्रा. एन.डी. पाटील महाविद्यालय, कुमार व कन्या प्राथमिक शाळा येथेही विविध कार्यक्रम आयोजनाने शिवजयंती सोहळा झाला. मोळवडे शाळेत प्रतिमापूजन, प्रभातफेरी, गीतगायन स्पर्धा झाल्या. सावे व शाहूवाडी शाळेत पोवाडा गायन, साहसी खेळ, वक्तृत्व स्पर्धा झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांचे वेश परिधान केले होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाळगडावर शिवजयंती मिरवणूक
आंबा ः ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली. येथील शिवाजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजन केले होते. शिवजयंती उत्सवाची सुरुवात महादेव मंदिर येथे झाली. महादेव मंदिर येथे शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. संजय भोसले, चंद्रकांत जंगम, नारायण भोसले आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महादेव मंदिर ते शिवाजी चौक दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने शिवज्योत आणण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डी. बी. जंगम, केरू भोसले, मंडळाचे अध्यक्ष मनोज भोसले, पोलिसपाटील उदय जंगम, कोतवाल प्रणित कदम उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी शिव विचारांवर मनोगते व्यक्त केली. नागेश जंगम, उत्तम भोसले, विशाल भोसले, महेश गुरव, राजा कदम, अनिल भोसले, पांडुरंग भोसले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हिंदू, मुस्लिम ग्रामस्थ, दर्गा ट्रस्टी व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवज्योत नेण्यासाठी गगनगडावर गर्दी
गगनबावडा : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गगनबावडा तालुक्यात आज शिवजयंती उत्साहात झाली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नियोजित शिवस्मारकाचे ठिकाणी स्मारक समितीचे, शिवप्रेमींतर्फे शिवजयंती झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गगनबावडा सरपंच मानसी कांबळे आदींचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. महिलांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा गायिला. शेणवडेत मुलींच्या लेझीम पथकाने लेझीम खेळ सादर केला. कार्यक्रमांचे नियोजन स्मारक समितीचे विनोद प्रभूलकर, संतोष गावडे, प्रकाश पाटील, मनोज देसाई यांनी केले. असळजला पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील सहकारी साखर काऱखान्यात शिवप्रतिमेचे पूजन सचिव नंदकुमार पाटील यांच्याहस्ते झाली. यावेळी कार्यकारी संचालक जयदीप पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. गगनगडावरुन पहाटेपासून अनेक शिवभक्तांनी शिवजयंतीसाठी शिवज्योती गावोगावी नेल्या. येथे श्रीराम मंदिरच्या प्रांगणात शिवजयंती झाली. तीन दिवसांपासून श्रीराम मंदिर प्रांगणात वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. आज छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत युवक प्रमाणावर उत्साहात सर्व कार्यक्रमांत सहभागी झाले होते. ‘जय भवानी जय शिवाजी...’चा जयघोष व ढोल-ताशांचा गजर करत तालुक्यात शिवजयंतीचा सोहळा उत्साहात झाला.
---------------
बोरपाडळेसह परिसरात विविध उपक्रम
बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, माले, मोहरे, मिठारवाडी, काखे आणि आंबवडे परिसरात छत्रपती शिवरायांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली. शहापुरात पहिल्यांदाच महिलांनी पारंपारिक वेशभूषा करत मिरवणुकीत सहभाग घेतला. बोरपाडळेत विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. येथील मराठा रियासत मंडळाने विविध स्पर्धा घेतल्या. संध्याकाळी ऐतिहासिक चित्रपट दाखवला. विविध सणांना व जयंत्याना ग्रामपंचायतीच्या सायलेन्सर काढून होणाऱ्या दुचाकींच्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याच्या आवाहनाला मालेतील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बहुतांश गावांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याचे दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.