03050
शिंपेतील सौरऊर्जा प्रकल्प बंद करा
तहसीलला निवेदन; गुराढोरांसह मोर्चा काढण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
शाहूवाडी, ता. २६ ः वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आणि गावावर लादण्यात आलेला शिंपे (ता. शाहूवाडी) येथील मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद करा; अन्यथा ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुराढोरांसह बिऱ्हाड मोर्चा काढू;.असा इशारा शेतकरी जनआंदोलनाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिला. येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयावर आज दुपारी मोर्चा काढून लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, शिंपेत मुख्यमंत्री सौर प्रकल्प राबविण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्प राबवला जात आहे. ठेकेदाराने त्यासाठी तीस वर्षांपूर्वी लावलेली झाडे तोडली आहेत. गाव पूरबाधित क्षेत्रात येते. शिवाय गायरान एकमेव संरक्षित जागा आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध आहे.’ मोर्चात ग्रामपंचायत ठेकेदार, ग्रामसेवक, तलाठी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गोविंद पाटील म्हणाले,‘‘आमचा जीव गेला तरी चालेल; हा प्रकल्प होऊ देणार नाही. उदय पाटील व माणिक पाटील म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीने या प्रकल्पाबाबतची माहिती लपवून ठेवली. गावसभा घेतली नाही. लोकांना प्रकल्पाबाबत अंधारात ठेवले.’ तलाठी, ग्रामसेविका व गावकामगार पोलिसपाटील यांच्या भूमिका संशयास्पद असून यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी ए. डी. पाटील यांनी केल. यावेळी सागर पाटील, सदाशिव पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार गणेश लव्हे यांनी स्वीकारले. प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू; असे तहसीलदार लव्हे त्यांनी सांगितले. यावेळी मोर्चात शिवाजी पाटील, उत्तम पाटील, आनंदा पाटील, भीमराव पाटील, आनंदा परीट, बाबसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.