कोल्हापूर

बंगळूरचे आव्हान कायम

CD

दणदणीत विजयासह
बंगळूरचे आव्हान कायम
सोफी डेव्हिनचे शतक एका धावेने हुकले
मुंबई, ता. १८ ः ‘करो या मरो’ अशा वाटेवर उभ्या असलेल्या बंगळूर संघाने गुजरातवर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवून महिला प्रीमियर लीगमधील आव्हान कायम ठेवले. झंझावाती खेळी करणाऱ्या सोफी डेव्हिनचे शतक एका धावेने हुकले.
स्पर्धेतले आव्हान कायम ठेवायचे, तर केवळ विजय नव्हे, तर सरासरीही उंचावण्याची गरज असलेल्या बंगळूर संघाने १८९ हे मोठे आव्हान १५.२ षटकातच पार केले. सोफी डेव्हिनने ३६ चेंडूत तब्बल २७५ च्या स्ट्राईक रेटने ९९ धावा टोलावल्या. यात तिने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. फॉर्म सापडलेल्या स्मृती मानधनाने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघांनी ९.२ षटकांत १२५ धावांची सलामी दिली.
तत्पूर्वी लौरा व्हॉलवर्ट (६८) आणि अॅशले गार्डनर (४१) यांच्या फटकेबाजीमुळे गुजरात संघाने २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या; परंतु विजयासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत.
संक्षिप्त धावफलक ः गुजरात जायंट्‌स ः २० षटकांत ४ बाद १८८ (लौरा व्हॉलवर्ट ६८ - ४२ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, एस. मेघना ३१ - ३२ चेंडू, ४ चौकार, अॅशले गार्डनर ४१ - २६ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, दयालन हेमलता नाबाद १६ -६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, हर्लिन देओल नाबाद १२ -५ चेंडू, १ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ३-०-२३-१, श्रेयांका पाटील २-०-१७-२) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः १५.३ षटकांत २ बाद १८९ (स्मृती मानधना ३७ - ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ९९ -३६ चेंडू, ९ चौकार, ८ षटकार, एलिस पेरी नाबाद १९, हेथर नाईट नाबाद २२, किम ग्रेथ ४-०-३२-१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT