anshuman gaekwad sakal
कोल्हापूर

Anshuman Gaekwad: लढवय्या फलंदाज हरपला! अशी होती अंशूमन गायकवाड यांची कारकीर्द

कर्करोगावर उपचार करण्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एक कोटींची रक्कम दिली होती.

CD

नवी दिल्ली, ता. ३१ ः भारताचे माजी सलामीवीर अंशूमन गायकवाड (वय ७१) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व करणारे गायकवाड सलामीचे फलंदाज होते. सुनील गावसकर यांच्यासह त्यांनी कसोटी सामन्यात सलामी केलेली होती. अंशूमन गायकवाड भारतीय संघाचे प्रशिक्षकही राहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००० मध्ये भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उपविजेता राहिला होता. लढवय्या फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी १२ वर्षांच्या कारकिर्दीत दोन शतके केलेली आहेत.

कर्करोगावर उपचार करण्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एक कोटींची रक्कम दिली होती. कर्करोगावरील उपचारासाठी ते लंडनला गेले होते. ते काही दिवसांपूर्वीच बडोद्याला परतले होते आणि तेथेच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. त्यांना जून २०१८ मध्ये बीसीसीआयकडून सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द

अंशुमन गायकवाडने 1974 ते 1985 दरम्यान 40 कसोटींच्या 70 डावांमध्ये 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 15 एकदिवसीय सामन्यांच्या 14 डावात 20.69 च्या सरासरीने 269 धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT