कोल्हापूर

कुस्तीत दोन सुवर्ण एक रौप्य,दुसरा दिवस.

CD

मुरगूडच्या स्वाती, वैष्णवीचे सुवर्ण तर अस्मिताचे रौप्यपदक
मुरगूड, ता. ४ : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशीही साई आखाड्याच्या कुस्तीगीरांची यशस्वी घोडदौड सुरु राहिली. महिला गटात मुरगूडच्या स्वाती संजय शिंदे हिने ५३ किलो गटात, तर वैष्णवी रामा कुशाप्पा हिने ७६ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. अस्मिता शिवाजी पाटील हिने ६२ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
५३ किलो गटात स्वातीने सातारा व पुणेच्या महिला मल्लांना पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. पुणेच्या श्रद्धा भोरसोबत अंतिम लढत झाली. लढतीत स्वातीने एकेरी पट काढून भारंदाज डावावर १० गुण मिळवून तांत्रिक गुणधिक्याने चितपट केले.
७६ किलो वजन गटात वैष्णवी रामा कुशाप्पा हिने रायगड ,अहमदनगर , सातारा येथील महिला कुस्तीगीरांना पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. पुणेच्या साक्षी शेलार सोबत झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत वैष्णवीने दुहेरी पट काढून मोळी डावावर १० गुण मिळवून तांत्रिक चितपटीने विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. ६२ किलो वजन गटात अस्मिता शिवाजी पाटील हिने रायगड , सांगली , सातारा येथील महिला कुस्तीगरांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली.अटीतटीने झालेल्या अंतिम फेरीत अस्मिताला पुणेच्या आकांक्षा नलावडेने २ गुणाने पराभूत केल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

क्रिकेटविश्व हादरलं! वर्ल्ड कप खेळलेल्या देशावर ICC ची मोठी कारवाई, सदस्यत्व निलंबित केलं

Vidhan Parishad Election : अमरावतीत चुरशीची लढत, विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार, प्रवीण पोटेंना नेमकं कुणाचं आव्हान?

JEE Exam Result : जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT