कोल्हापूर

देशभरातील ६२० मल्ल सहभागी

CD

3439 व 3440
मुरगूड : येथे मॅटवरील राष्ट्रीयस्तर कुस्ती स्पर्धेचे शुक्रवारी शानदार उद्‍घाटन झाले. त्यावेळी गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, मनोज फराकटे आदी. दुसऱ्या छायाचित्रात कुस्ती स्पर्धेतील एक क्षण. (छायाचित्र : राजू चव्हाण, मुरगूड)

लोगो - राष्ट्रीयस्तर लाल आखाडा कुस्ती

देशभरातील ६२० मल्ल सहभागी
हरियाणाचा सतीशकुमार, सुनील खत्तार, यश वाळवद, हर्षवर्धन पाटीलची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. ३ : येथे आजपासून सुरू झालेल्या मॅटवरील राष्ट्रीयस्तर लाल आखाडा संकुल चषक कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नामांकित ६२० पेक्षा अधिक मल्लांनी सहभाग घेतला आहे. खुल्या गटात हरियाणाचा सतीशकुमार व तुषार ठोंबरे (शिंगणापूर, सातारा) यांच्यातील लढत चटकदार झाली. त्यात सतीशकुमारने विजयी सलामी दिली. येथील विश्वनाथराव पाटील कला, क्रीडा व सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणीत लाल आखाडा संकुल स्पर्धेचे आयोजक आहे.
पहिल्या दिवशी सुनील खत्तार (राष्ट्रकुल आखाडा), यश वाळवद (पुणे), हर्षवर्धन पाटील (पाचगाव) यांनी विविध वजनी गटात विजयी सलामी दिली. दरम्यान, स्पर्धेचे उद्‍घाटन गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब सूर्यवंशी, अॅड. सुधीर सावर्डेकर यांनी काटा पूजन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, सेवानिवृत्त अबकारी खात्यातील निरीक्षक बाळासाहेब अवघडे, सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक कुमार ढेरे, डॉ. नवज्योतसिंह देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, नामदेव मेंडके, शिवाजी चौगले, जयसिंग भोसले, डी. डी. चौगले, रणजित सूर्यवंशी, मयूर आवळेकर, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील आदी उपस्थित होते.
खुल्या गटातील विजेत्यांसाठी एक लाख २५ हजार ६२५, चषक, चांदीची गदा, दुसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार ६१६ रुपये रोख, चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ५० हजार ६१६ रुपये रोख व चषक, तर चौथ्या स्थानासाठी २१ हजार ६१६ व चषक असे बक्षीस आहे. ५७ किलो वजनी गटासाठी उपमहाराष्ट्र केसरी (कै.) प्रकाश चौगले चषक, तर ४६ किलो गटासाठी (कै.) अर्जुन मसवेकर चषक कुमार केसरी गदा देण्यात येणार आहे. राजाराम चौगुले व बटू जाधव यांनी निवेदन केले. संभाजी वरुटे, बापू लोखंडे, प्रकाश खोत, कृष्णात पाटील, बाळू मेटकर, रवींद्र पाटील, सतीश मगदूम, सुरेश लंबे, अशोक फराकटे, के. बी. चौगुले पंच म्हणून काम पाहत आहेत.
०००००००००००------------------
फोटो : मुरगूड : येथील मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, मनोज फराकटे आदी मान्यवर. तर दुसऱ्या छायाचित्रात कुस्ती स्पर्धेतील एक क्षण. (छायाचित्र : राजू चव्हाण, मुरगूड.) mur31,2.jpg
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT