कोल्हापूर

मुरगूड : वार्षिक अंदाजपत्रक.

CD

03526

मुरगूडला ७३ कोटी ४१ लाखांचे
वार्षिक अंदाजपत्रक जाहीर


मुरगूड, ता. १७ : मुरगूड नगरपरिषदेचे २०२३-२४ आर्थिक वर्षाकरिता ७३ कोटी ४१ लाख ९४ हजार ५०० रू.चे एकत्रित व ६ लाख १२ हजार ५०० रू. चे शिलकी अंदाजपत्रक प्रशासक संदीप घार्गे यांनी मंजूर केले आहे. याविषयीची माहिती मुख्याधिकारी घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य लेखाधिकारी अनिकेत सूर्यवंशींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
अंदाजपत्रकात महसुली जमा ८ कोटी ९२ लाख १४ हजार ५०० रु., महसुली खर्च ८ कोटी ८६ लाख २ हजार तर अखेरची शिल्लक ६ लाख १२ हजार ५०० रु. असून भांडवली जमा ६४ कोटी ४९ लाख ८० हजार तर भांडवली खर्च ६४ कोटी ४९ लाख ८० हजार आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जमेकडील बाजूला पालिकेस विविध करांपासून मिळणारे उत्पन्न व अनुदानांचा समावेश आहे. खर्चाच्या बाजूस कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन व इतर लाभ, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छताविषयक सेवा, नगरपरिषद वर्धापन दिन, महिला व बालकल्याण अपंग कल्याण व मागासवर्गीय कल्याण योजना राबविणे तसेच शहरात इमारती बांधकाम, रस्ते, शौचालय व गटर्स करणे, सीसीटीव्ही बसविणे, वीज बचतीकरिता सोलर प्रोजेक्ट राबविणे, घनकचरा व्यवस्थापनविषयक कामे, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविणे, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना राबविणे, आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक यांचा समावेश आहे. यावेळी शहर अभियंता प्रकाश पोतदार, प्राजक्ता पिंपळे (बांधकाम विभाग), रमेश मुन्ने (कर विभाग), ज्योती पाटील (मिळकत विभाग), मारुती शेट्टी, रणजित निंबाळकर, जयवंत गोधडे, अमर कांबळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT