कोल्हापूर

निसर्गाला ओरबाडू नका, तोच जीवन आनंदी बनवेल : सूर्यवंशी

CD

04413
वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी
.....

निसर्गाला ओरबाडू नका, तोच
जीवन आनंदी बनवेल : सूर्यवंशी

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १३ : ‘निसर्ग सर्वात मोठा दाता आहे. तो सर्वांना मुक्त हस्ते भरभरून देतो. त्याच्याशी कृतघ्न होऊ नका. त्याला ओरबाडू नका. कृत्रिम जीवनातून मिळणाऱ्या क्षणिक सुखाने मानवी जीवन यातनामय बनत आहे. निसर्गाकडे चला, तो आपले जीवन आनंदी बनवेल,’ असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी केले.
सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे समाजभान फाउंडेशनतर्फे आयोजित संस्कार शिबिरात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमास प्रा. के. बी. पाटील, पांडुरंग महाजन, सागर कांबळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सूर्यवंशी यांनी प्रारंभी शिबिरार्थींना परिसरातील वृक्षांची माहिती दिली. त्याचबरोबर रोपनिर्मिती, वृक्षारोपण, डोंगरमाथी बियांची हवाई पेरणी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिबिरामध्ये असताना बिया जमा करण्याचे आवाहनही केले.
समाजभान फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जगदीश कांबळे यांनी आभार मानले. यावेळी अजित कांबळे, विठ्ठल पाटील, नंदकुमार हिरुगडे यांच्यासह शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT