कोल्हापूर

मुरगूडमधील स्मशानशेड परिसराची स्वच्छता करा

CD

मुरगूडमधील स्मशानशेड
परिसराची स्वच्छता करा

मुरगूड, ता. ५ : देवगड-निपाणी राज्य मार्गावरील स्मशानशेडभोवती झाडेझुडपे आणि गवतांचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे अडचणीचे ठरत आहे. हा परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी नागरीकांनी मुरगूड नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
पुरामुळे गावभागातील स्मशानभूमी पाण्याखाली गेली तर लोक या स्मशानभूमीचा वापर करतात. मात्र, येथे झाडेझुडपे वाढल्यामुळे या स्मशानभूमीकडे जाणे अडचणीचे ठरत आहे. काही दिवसापूर्वी स्मशानभूमी दुरुस्ती करावी, यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर स्मशानभूमीची डागडुजी करून या ठिकाण असलेला नगरपालिकेचा कचरा हटवून प्रशासनाने तेथील स्वच्छता करून बैठक व्यवस्था केली होती. मात्र, त्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे तेथील बाकड्यांची मोडतोड झाली आहे. तसेच सभोवती गवताचे आणि झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली.
मागणीचे निवेदन सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, सोमनाथ यरनाळकर, हृषीकेश भारमल, अजित कांबळे, सूरज खंडागळे, तानाजी भराडे, संकेत भोसले यांनी दिले. दरम्यान यावेळी मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी आरोग्य विभागास योग्य त्या सूचना देऊन स्मशानशेड परिसरात वाढलेले गवत, झाडेझुडपे काढण्याच्या सूचना दिल्या.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT