कोल्हापूर

कुरुकलीत गटारीचे काम निकृष्ट.

CD

5224
मुरगूड : कुरुकली (ता. कागल) येथील केलेले गटरचे काम.
...............
कुरुकलीत गटार काम निकृष्ट
झाल्याने नागरिकांत नाराजी

मुरगूड, ता. १८ : कुरुकली (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या गटारीचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन काम दर्जेदार करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या कुरुकलीत विविध ठिकाणी रस्ते, गटर्स व नळपाणी योजनेची कामे सुरू आहेत. आठवड्यापूर्वीच प्राथमिक शाळेच्या मागे असणाऱ्या गटरचे काम केले आहे. येथे २५ वर्षांपूर्वी दगडी गटर बांधली होती. कालांतराने या गटारीतील पाणी शाळेत पाझरू लागले. तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी शाळा दुरुस्ती निधीतून शाळेतील फरशी बदलण्यात आली. यावर्षी विविध निधीतून कोट्यवधीचा निधी गावच्या विकासासाठी मिळाला आहे. मात्र, सध्या गावात सुरू असलेली कामे दर्जाहीन आहेत. ठेकेदाराला निव्वळ पोसण्याचे काम सुरु असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्राथमिक शाळेच्या मागे असलेल्या गटारीच्या काम ठेकेदाराने घाईगडबडीत उरकले आहे. त्यामुळे गटारीत पुन्हा पाणी तुंबून राहणार आहे. परिसरातील नागरिकांची आरसीसी गटर बांधण्याची मागणी असताना ती धुडकावून यू टाईप गटर बांधले आहे. त्यामुळे पुन्हा समस्या निर्माण होणार आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT