कोल्हापूर

तरच माणूस बौद्धिक प्रगत होऊ शकतो.: उपराकार माने.

CD

5446, 5447
निढोरी ः येथील कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण माने. समोर उपस्थित.
............
...तरच माणूस बौद्धिक प्रगत होईल

लक्ष्मण माने ः ‘वर्तमानात महापुरुष समजून घेताना’वर व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २५ : ‘विचारवंतांच्या विचारांना बळ देण्याची, संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज आहे. दर्जेदार शिक्षण, आरोग्य, वीज, रोजगार, पाणी व अन्न या आपल्या मूलभूत गरजा आहेत. ते आपले अधिकार आहेत. शासनाने त्या मोफत पुरवल्या तरच माणूस बौद्धिक प्रगत होऊ शकतो,’ असे मत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.
निढोरी (ता. कागल) येथे ॲटवन्स ग्रुपतर्फे आयोजित ‘वर्तमानात महापुरुष समजून घेताना’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त विक्रीकर निरीक्षक सुखदेव सागर होते. माजी सरपंच देवानंद पाटील प्रमुख उपस्थित होते.
माने म्हणाले, ‘देश, धर्मप्रेम, परधर्मद्वेष यामध्ये देशातील बहुसंख्य लोकांना गुंतवून आपल्या श्रमाची व अधिकाराची लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय देशावरचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संकट टळू शकणार नाही.’
संयोजक देवानंद पाटील म्हणाले, ‘बहुजनांच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या विचारवंतांचा सर्वात मोठा अनादर बहुजनांकडूनच होतो, हे दुर्दैवी आहे. प्रबोधित झालेल्या तरुणांनी ही लढाई हाती घेतली पाहिजे. डोके ताळ्यावर ठेवून आपला शत्रू ओळखा.’
यावेळी तुकाराम देसाई, सुरेश सागर, दलितमित्र डी. डी. चौगले, तात्यासाहेब कांबळे, दत्ता पाटील, नवल बोते, सतीश घाटगे, बी. एस. खामकर, पी. एस. कांबळे, बी. एल. मचाले यांच्यासह दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बी. के. पाटील, भिकाजी मोरबाळे, राजेंद्र पाटील, सुशील जोंधळे, रणजित खेबुडे, भैरवनाथ मगदूम, रंगराव रंडे, शामराव सावंत, गणपत मगदूम, भगवान शेटके आदी उपस्थित होते. बी. एल. कांबळे यांनी स्वागत केले. देवानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय काळे यांनी निवेदन केले. सविता चौगले यांनी आभार मानले.
......
चौकट...
विकास योजना नव्हेत, घातचक्र
८० कोटी लोकांना घरबसल्या कोणतेही शारीरिक व बौद्धिक श्रम न करता फुकट धान्य व पैसे देणाऱ्या सरकारच्या योजना या विकास योजना नव्हेत. देशवासीयांना आळशी, दरिद्री बनविणारे हे घातचक्र आहे, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT