कोल्हापूर

नगरपालिका कचरा समस्या......

CD

लोगो- घेणे
भाग- ८
.....
05493
मुरगूड ः येथील कचरा शेड उभारणी.
............
मुरगूडला कचऱ्यासाठी डंपिंग ग्राउंडची वानवा

ठेकेदार पद्धतीने कचरा उठाव; घनकचरा प्रकल्प लोकवस्तीत

प्रकाश तिराळे : सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १६ : शहरात दररोज सहा टन कचरा जमा होतो. तीन ते साडेतीन टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित अडीच ते तीन टन कचरा साठवणूक करण्यासाठी डंपिंग ग्राउंडची वानवा आहे. घनकचरा प्रकल्प लोकवस्तीत असल्यामुळे शहराबाहेर डंपिंग ग्राऊंड खरेदीची गरज आहे. सध्या ठेकेदार पद्धतीने होत असलेला कचरा उठाव पुरेसा नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांकडे मास्क, सुरक्षित बूट, हातमोजे यांची कमतरता दिसते. साहित्य पुरवले असून, कर्मचारी ते वापरत नसल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे.
वैद्यकीय कचरा ठेकेदार एजन्सीमार्फत आठवड्यातून एक दिवस संकलित केला जातो. दररोज जमा होणारा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो, तिथे पुन्हा त्याचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून श्रेडिंग करून खत बनवले जाते. ते नागरिकांना कमी किमतीत विकत दिले जाते. प्रक्रिया केल्यानंतरही दररोज तीन टन गाळमाती कचरा प्रक्रियेविना शिल्लक राहतो. प्रक्रियेविना शिल्लक राहिलेला कचरा डेपोमध्ये ठेवला जातो. शक्यतो हा सर्व कचरा भरावासाठी वापरला जातो.
शहरात प्लास्टिक बंदी केली असून, प्लास्टिक विक्री करणारे दुकानदार व संबंधित घटकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली आहे. कचरा विल्हेवाट करण्यासाठी नगरपालिकेने साडेअकरा लाखांची नवीन मशीन आणण्याचे नियोजन केले असून, ते लवकरच दाखल होणार आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा दोनमधून कोट्यवधी रुपये खर्चाचे ओला व सुका कचरा प्रक्रिया शेड शास्त्रोक्त भूभरण युनिट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
....
दृष्टिक्षेपात..
-दररोज सहा टन कचरा जमा
-ओला दीड ते दोन टन
- सुका एक ते दीड टन
-कचरा स्वतंत्र करण्यासाठी घंडागाडीत वर्गीकरण
- दरवर्षी कचऱ्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च
- तीन टन गाळमाती कचरा प्रक्रियेविना शिल्लक
...
शेवगा लागवड..
घनकचरा प्रकल्पात जुना कचरा ज्या ठिकाणी होता, त्याची विल्हेवाट लावून मोकळ्या झालेल्या १० गुंठे जागेत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेवगा रोपांची लागवड केली आहे. त्यासाठी ठिबक सिंचनची सोय केली आहे.
...
बाजार व कचरा....
मुरगूडचा आठवडी बाजार मंगळवारी भरतो. बाजारपेठेत दिवसभरात सुमारे सात ते आठ टन भाजीपाला व अन्य प्रकारचा कचरा तयार होतो. बुधवारी २० ते २२ आरोग्य कर्मचारी हा कचरा जाग्यावरच भाजीपाल्याची वेस्टेज, प्लास्टिक असे वेगवेगळे वर्गीकरण करून ट्रॅक्टरमधून भरुन नेतात.
--
कोट
05487
स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्याचा पालिकेचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. नागरिक ओला व सुका कचरा देण्यावर भर देतात. दुकान विक्रेते व प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. ओला व सुका कचरा जे देत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेची गरज असून लोकवस्तीपासून बाहेर जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सचिन भोसले, आरोग्य अधिकारी,मुरगूड.
....
05488
घंटागाडीमार्फत कचरा उठाव होतो, पण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तांत्रिक आरोग्य सेवक नाहीत, प्रशिक्षित सुपरवायझर नाहीत. मराठी शाळेजवळ उकिरडे आहेत. त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसते.
- जोतिराम सुर्यवंशी-पाटील, नागरिक
.....
05489
नगरपालिकेची कचरा उठावाची यंत्रणा चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, पण नागरिक कचरा देत असताना ओला व सुका असे वर्गीकरण करून देत नसल्याचे दिसते. यासाठी पालिका प्रशासनाने त्यांना ताकीद देऊन सुका व ओला कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करावा.
- दलितमित्र डी. डी. चौगुले, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT