06314
मुरगूड : येथील समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना संपत देसाई.
--
राज्यातील हजारो शाळा बंद
होण्याची भीती : डॉ. संपत देसाई
मुरगूडला समाजवादी प्रबोधिनीतर्फे व्याख्यानमाला
मुरगूड, ता. १३ : पडक्या शाळा इमारती, अपुऱ्या सुविधा, शौचालयांची दुरवस्था यामुळे विशेषतः मुलींची शाळाबाहेर पडण्याची संख्या वाढत आहे.
कंत्राटी शिक्षक, नवीन शैक्षणिक धोरण आणि संचमान्यता नियमांमुळे राज्यातील हजारो शाळा पुढील एक ते दोन वर्षांत बंद होण्याची भीती आहे, असे मत अभ्यासक संपत देसाई यांनी व्यक्त केले.
मुरगूड (ता. कागल) येथे समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ‘महात्मा फुले आणि आजची शिक्षण व्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. स्वच्छता निरीक्षक सागर येवार अध्यक्षस्थानी होते.
डॉ. देसाई म्हणाले, ‘शासकीय धोरणांमुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे कंगालीकरण होत असून ही व्यवस्था भारतीय समाजाला कंगाल करणारी ठरत आहे. भारतातील शिक्षण वाचवू शकलो नाही, तर महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. असे ठाम मतही त्यांनी मांडले. यावेळी नगरसेवक शिवाजी चौगले, दत्तात्रय मंडलिक उपस्थित होते.
बी. एस. खामकर यांनी स्वागत केले. बबन बारदेस्कर यांनी आभार मानले. समीर कटके यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी दलितमित्र डी. डी. चौगले, एम. टी. सामंत, महादेव वागवेकर, सदाशिव एकल, शाहू फर्नांडिस, बाबूराव शिरसेकर, रणजित कदम, मोहन कांबळे, भिकाजी कांबळे, सखाराम सावर्डेकर, जयवंत हावळ, विद्यागौरी हावळ, राहुल कांबळे, प्रदीप वर्णे, अनिकेत कदम, अक्षय कांबळे,पापा जमादार आदी उपस्थित होते.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.