06317
मुरगूड : येथील समाजवादी प्रबोधिनीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. आनंद मेणसे.
शिक्षणच्या खासगीकरणाचा डाव
डॉ. आनंद मेणसे ः मुरगूडला समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यान
मुरगूड, ता. १३ : आजची व्यवस्था चलाख आहे, राज्यघटनेचा जयजयकार करून शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा डाव रचला जात आहे. खरे तर उघडपणे मनुस्मृतीचे समर्थन करता येत नसल्याने आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे बदलता येत नसल्याची अडचण असल्याने अशी दुहेरी भूमिका घेतली जात आहे, असे मत प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
समाजवादी प्रबोधिनी, मुरगूडतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मनूस्मृती दहन व चवदार तळ्याच्या सत्याग्रह’ या विषयावर दुसरे पुष्प प्राचार्य डॉ. मेणसे यांनी गुंफले. नामदेवराव मेंडके अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक राजू आमते, सुहास खराडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मेणसे म्हणाले, भविष्यात भारतात मनुस्मृतीच विषमतेवर आधारित समाज उभी करण्यास सहाय्यभूत ठरेल. मनुस्मृतीने जे जे नाकारले, ते ते राज्यघटनेने स्वीकारले आहे. मात्र, आजही भारतीय समाज कळत - नकळत मनुस्मृतीच्या नियमांनुसार वागताना दिसतो. दलित, मुस्लिम, आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे हे राज्यघटनेच्या मूल्यांना धरून नाही. आज व्यवस्था समाजाला भुलवून शिक्षण व सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करत आहे. त्यांनी मनुस्मृतीतील २५ हून अधिक नियमांचे सोप्या भाषेत विवेचन करत त्याचा आजच्या सामाजिक, सांस्कृतिक वर्तनावर होणारा परिणाम स्पष्ट केला.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. समीर कटके यांनी स्वागत केले. बी. एस. खामकर यांनी आभार मानले.
यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, डी. डी. चौगले, शिवाजी चौगले, एम. टी. सामंत, शरद कुलकर्णी, कीर्तीकुमार जोशी, निखिल वाली, विजय सापळे, सचिन सुतार, राजेश व्हनबट्टे, बाळासाहेब फर्नांडिस, महादेव वागवेकर, सखाराम सावर्डेकर, विश्वनाथ शिंदे, मनाजी सासने, एम. बी. कांबळे, गणपतराव मांगोरे, सर्जेराव अवघडे आदी उपस्थित होते.
06317
MUR26B06317
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.