कोल्हापूर

रस्त्यासाठी महिलांची कार्यक्रमातच घोषणाबाजी

CD

06352

मुरगूडला महाराजस्व समाधान शिबिर
४,४६० खातेदारांना लाभ; रस्त्यासाठी महिलांची घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा

मुरगूड, ता. ८ : येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात महसूल विभागाकडील ५०४, पुरवठा विभागातील ९३०, महा इ सेवा२६४, महिला बचत गट १७, एकात्मिक बाल विकास प्रकल्प ६३, महावितरण विभाग ३, आरोग्य विभाग २, हजार ६८९ अशा ४ हजार ४६० खातेदारांना लाभ देण्यात आला. या कार्यक्रमातच रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी महिलांनी घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग होते.
शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित कामे शिबिरांतर्गत करून देण्यात येतील. यावेळी पुरवठा विभागाकडील संगणकीकृत शिधापत्रिकाचे वाटप झाले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी अतिश वाळुंज, भूमिअभिलेख उपअधीक्षक सौरभ तुपकर यांच्यासह नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, पंचायत समिती सदस्या रुपाली दीपक, माजी पंचायत समिती सदस्य आर. डी. पाटील, नगरसेवक राजू आमते, शिवाजी चौगले उपस्थित होते. अनुष्का पाटील यांनी स्वाग, मंडल अधिकारी सचिन हाके यांनी प्रास्ताविक केले. शंकर चौगले यांनी आभार मानले.
दरम्यान चिमगांव-भारमलनगर वसाहतीतील रस्त्याचा वाद शिबिरापर्यंत पोहोचला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या भाषणावेळीच रस्ता आमच्या हक्काचा, आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे, अशा घोषणा महिला व नागरिकांनी देत सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे गोंधळ उडाला. तहसीलदारांना पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिस सभागृहात आल्यावर आंदोलकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. चिमगावपैकी भारमलनगर येथे गट न ३३० ३२९ व ३४० यामध्ये यापूर्वी केलेला रस्ता व वहिवाटीतील रस्ता बंद करण्यासंबंधी केलेली नोटरी त्यातून बंद केलेला रस्ता व त्यामुळे वाद सुरू आहे. याबाबत गुरुवारी (ता. ७) तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी दोन्ही पक्षकारांत तहसीलदारांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. त्यानंतर आज आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने प्रकरण हाताळताना तहसीलदार वाकडे यांची दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT