06585
मुरगूड : मुदाळतिट्टा-निपाणी मार्गावर शिंदेवाडी येथे असलेली धोकादायक मोरी. (छायाचित्र वेदांतिका फोटो, कुरुकली)
--
अपुऱ्या कामांचा वाहनधारकांना फटका
मुदाळतिट्टा-निपाणी मार्गावर वाढते अपघात चिंताजनक
प्रकाश तिराळे : सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. १४ : तब्बल ४५० कोटी रुपये खर्चून शासनाने ‘हायब्रीड ॲम्युनिटी’ या प्रायोगिक तत्त्वावर फोंडा-निपाणी राज्य मार्गाचे नूतनीकरण केले; पण अपुऱ्या कांमामुळे आणि रस्त्याच्या सुमार दर्जामुळे निपाणी- मुदाळतिट्टा रस्त्यावर अपघाताची संख्या वाढत आहे. वर्षभरात २५ ते ३० अपघातात होत आहेत. आदमापूर आणि मेतके येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे या फोंडा-निपाणी या राज्य मार्गाचे नूतनीकरण केले; पण मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
मुदाळ तिट्ट्यापासून लिंगनूरपर्यंतच्या रस्त्याचा दर्जा सुमार आहे. हा रस्ता संबंधित ठेकेदार कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेची कसलीही काळजी न घेता, दर्जा न बघता केला. परिणामी, या रस्त्याच्या कामांत त्रुटी राहिल्या आहेत. या राज्य महामार्गाचे नूतनीकरण करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. मोरी, ओढ्यावरील पूल अर्धवट आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मेतके आणि आदमापूर येथे अमावास्येला कर्नाटक व अन्य ठिकाणांहून येणारी वाहने भरधाव धावतात. याकडे पोलिस प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसते.
लिंगनूरपासून मुदाळतिट्टयापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी मोठ खड्डे पडले आहेत. जितेंद्रसिंग कंपनीकडे या मार्गाची देखभालीची जबाबदारी आहे; पण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. मुद्दाळ-निपाणी हा रस्ता नव्यानेच केला आहे; पण, तो करताना आदमापूरमध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन मुदाळतिट्ट्यापासून-निढोरीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते.
--
रस्ता कामात या त्रुटी -
- रस्ते प्रकल्पात रुंदीकरणाऐवजी रस्ता अरुंदच ठेवला
- दोन्ही बाजूला आरसीसी गटर व त्यावर उंचवटे केले
- पूर्वी असणारी बाजूपट्टी इतिहास जमा
- ओढ्यावरील मोरी, पूल अर्धवट
चौकट :
आदमापूर उड्डाणपुलामुळे
वाहतूक कोंडीत भर
आदमापूर येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारला आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसेच मुदाळतिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. परिणामी, वाहतुकीस अडचण होते. येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने मोकळा मार्गच शिल्लक नसतो. आदमापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस व देवस्थान प्रशासनाने धडक कारवाई करत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
......
दृष्टिक्षेपात (फोंडा-निपाणी राज्य मार्ग)
- साडेचारशे कोटींचा रस्ता
- शिंदेवाडी, मुरगूड, निढोरीमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर
- महापुरात मुरगूडला येते बेटाचे स्वरुप
- मेतके, आदमापूर तिर्थक्षेत्रांमुळे वाहतुकीचा ताण वाढला
- मोरींची व इतर कामे अर्धवट
MUR26B06585
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.