कोल्हापूर

सादळे - मादळे कासारवाडी घाटात ट्रॅक्टर अपघातात एक ठार

CD

2479
...

कासारवाडी घाटात ट्रॅक्टर
अपघातात एक जण ठार
नागाव, ता. २९ : सादळे-मादळे कासारवाडी घाटात ट्रॅक्टर अपघातात एक जण ठार झाला. कुमार कोंडिबा चौगुले (वय ३०, रा. मादळे, ता. करवीर ) असे त्यांचे नाव आहे. घाट रस्त्याच्या नागमोडी वळणावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. चौगुले हे गंभीर जखमी होते. उपचारासाठी त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुपारी झालेल्या या अपघाताची रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.
याबाबत घटनास्थळी व सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेली माहिती अशी, कुमार चौगुले हे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून सेट्रिंगचे साहित्य घेऊन मादळे येथून टोपकडे निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास येथील एका कॉलेजच्या मागील वळणावर ट्रॅक्टर आला असता चालकाचा ताबा सुटल्याने नागमोडी वळणावर ट्रॅक्टर खड्ड्यात गेला. आपल्या बचावासाठी चालक चौगुले यांनी उतरण्याचा प्रयत्न केला.पण पाय अडकल्याने ते खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना समजताच मादळे येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चौगुले यांना तत्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT