Ceramic tiles showroom fire sakal
कोल्हापूर

Fire Accident : सिरॅमिक टाईल्स शोरूम आगीत खाक; सहा कोटी रुपयांचे नुकसान

सांगली फाटा येथील दुर्घटना; दोन शोरूमचे सहा कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नागाव : सिरॅमिक टाईल्स शोरूम व गोडाऊनला अचानक आग लागल्याने सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोल्हापूर-सांगली महामार्गावर पुलाची शिरोली येथील मार्बल लाईनला असणारे‍ इंगळे सिरॅमिक टाईल्स अचानक लागलेल्या भीषण आगीत पूर्णतः भस्मसात झाले.

नंतर ही आग शेजारीच असणाऱ्या‍ चंदवानी सिरॅमिक टाईल्सला लागली. कोल्हापूर, इचलकरंजी व औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी चंदवानी सिरॅमिकची आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

तब्बल तीन तासानंतर ही आग नियंत्रणात आली. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, शिरोलीचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पहाटे चारच्या सुमारास इंगळे सिरॅमिक टाईल्स या शोरूमला आग लागली असल्याचे तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तत्काळ संबंधित वरिष्ठांना याची माहिती दिली. माहिती मिळताच इंगळे सिरॅमिकचे मालक अजित इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्याचप्रमाणे शोरूमशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनाही घटनास्थळी बोलवण्यात आले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले.

त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केले होते. तर हवेत सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. शोरूमला असणारी आग मागील बाजूस असणाऱ्या‍ गोडाऊनला लागली होती. आग आटोक्यात येण्यापूर्वी अग्निशमन दलाच्या टँकरचे पाणी संपले. परत पाणी मागवण्यात वेळ गेला.

नागाव येथील खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांना बोलावून हे पाणी अग्निशमन दलाच्या टँकरमध्ये भरण्यात आले. तोपर्यंत गोडाऊनही जळून खाक झाले. ही आग शेजारी असणाऱ्या‍ चंदवानी सिरॅमिकच्या केबिनला असणाऱ्या‍ एसी केबलव्दारे चंदवानी सिरॅमिकच्या शोरूममध्ये पोहचली. परत पाणीटंचाई निर्माण झाली.

त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळ व इचलकरंजी येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. यामध्ये चंदवानी सिरॅमिकचे शोरूम पूर्णपणे जळाले. मात्र गोडाऊनला लागलेली आटोक्यात आली. पण इंगळे सिरॅमिकचे शोरूम व गोडाऊन जळाले. संपूर्ण शोरूम व गोडाऊन फॅब्रिकेटेड होते.

पण आतमधील वस्तू प्लास्टिक, फायबर, प्लायवूड व इपॉक्सी कोटेड टाईल्स असल्यामुळे या सर्व वस्तू ज्वलनशील होत्या. आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे लोखंडी अँगल, चॅनेल व पत्रे गरम होऊन पूर्णतः खराब झाले. शोरूमच्या आगीत एसी, फर्निचर, संगणक, महत्त्‍वाची कागदपत्रे व फाईल्स जळून भस्मसात झाले.

यामध्ये इंगळे सिरॅमिकचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर चंदवानी सिरॅमिकचे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा शिरोलीचे तलाठी नितीन जाधव व कोतवाल संदीप पुजारी व दादाभाई देसाई यांनी केला आहे. चंदवानी सिरॅमिकचे मालक निकेष प्रकाश चंदवानी व मयूर दिलीप चंदवानी यांनी याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT