कोल्हापूर

मोटारसायकल चोरट्यास अटक करून तीन मोटारसायकली जप्त ; शिरोली पोलिसांची कारवाई

CD

चोरट्याकडून तीन मोटारसायकली जप्त

नागाव, ता. १९ : मोटारसायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. निलेश तानाजी देसाई ( वय २३, रा. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली ) असे त्याचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील परमार पेट्रोल पंप येथील रस्त्यावर ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार औद्योगिक वसाहतीमधील परमार पेट्रोल पंप येथील रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी होती. नाकाबंदीच्या वेळी नंबर प्लेट नसणारी मोटारसायकल घेऊन निलेश देसाई तेथे आला. मोटारसायकलला नंबर प्लेट का नाही याची चौकशी पोलिसांनी केली. तसेच मोटरसायकलच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र देसाई याच्याकडून मिळालेली उत्तरे समाधानकारक नसल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. यामध्ये ही मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता आणखी दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली देसाई याने दिली. कोल्हापूर येथील शाहूपुरी व लक्ष्मीपुरी, तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर पोलिस ठाणे परिसरातून आपण मोटरसायकली चोरल्याचे देसाई याने शिरोली एमआयडीसी पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलिस ठाण्यात चौकशी केली असता तेथील गुन्हे रजिस्टरला मोटरसायकल चोरीचे हे गुन्हे दाखल असल्याचे समजले. त्यानुसार शिरोली एमआयडीसी पोलिसांनी निलेश देसाई याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या.
सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश जंगम, नजीर शेख, महेश अंबी, सचिन परीट, सुरेश कांबळे, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT