कोल्हापूर

चुकीचे पार्किंग वाहतूक कोंडीस कारणीभूत

CD

लोगो ः ग्राउंड रिपोर्ट
----------------------
02682
१ ) शिरोली : सांगली फाटा येथे मुख्य महामार्गावर दोन मोटारी पार्किंग करून चालक निघून गेल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.
02681
२ ) शिरोली : पुलाची शिरोली येथील पाण्याच्या टाकीजवळ नो पार्किंग झोन आहे मात्र तेथेच वाहने पार्किंग करत वाहनधारक प्रशासनालाच प्रतीआव्हान देत आहेत. (अभिजित कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)

--------------------------------------
चुकीचे पार्किंग वाहतूक कोंडीस कारणीभूत
राष्ट्रीय महामार्गावर टोप ते पंचगंगा पुलापर्यंत वाहनतळाचा अभाव; पोलिसांचे दुर्लक्ष

अभिजित कुलकर्णी
नागाव : महामार्गालगत असणारे छोटे मोठे व्यवसाय, रेंगाळलेले सहापदरीकरण, टोप ते पंचगंगा नदी पुलापर्यंतच्या अंतरात वाहन पार्किंग तळाचा अभाव अशा विविध कारणांमुळे सेवा मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर बिनधास्त वाहने पार्किंग केले जाते. महामार्गावर चुकीच्या ठिकाणी होणारे पार्किंग महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीचे महत्वपूर्ण कारण ठरत आहे. तरीही महामार्ग पोलिस व शिरोली एमआयडीसी पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोपपासून पंचगंगा नदी पुलापर्यंतच्या सुमारे सात किलोमीटर अंतरात ट्रक पार्किंग सुविधा नाही. मात्र या अंतरात शेकडो गोदामे, शिरोली एमआयडीसीसारखी मोठी औद्योगिक वसाहत, मार्बल हब आणि शंभरहून अधिक स्टोन क्रशर व्यवसाय आहेत. या सर्वांना मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाहनांची आवश्यकता असते. त्यामुळे या परिसरात दोनशे पन्नासहून अधिक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. येथूनच कागल, गोकुळ शिरगाव, हातकणंगले औद्योगिक वसाहतींना वाहने पुरवली जातात. त्यामुळे हा परिसर ट्रान्सपोर्टचे हब बनत आहे. त्या पटीतच या परिसरात मालवाहतूक अवजड वाहनांची वर्दळही पहायला मिळते. पण वाहन पार्किंग व्यवस्था नसल्याने ही वाहने मिळेल त्या जागेवर पार्किंग केलेली आढळतात. महामार्गाच्या दुतर्फा असणारे सेवा मार्ग वाहन पार्किंगचा अड्डा बनले आहेत. या शिवाय शिये फाटा, शिरोली औद्योगिक वसाहत, नागाव फाटा, शिरोली व सांगली फाटा येथे असंख्य मालवाहतूक वाहने महामार्गाच्या बाजूलाच पार्किंग केलेली असतात. यामुळे महामार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत.
सेवा मार्गावर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे स्थानिक प्रवासी वाहने सेवा मार्गाऐवजी महामार्गाला प्राधान्य देतात. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. शिवाय वाहतुक कोंडीमुळे वेळ आणि इंधन बचतीचे सुत्रही बिघडले आहे. नागाव - शिरोली ट्रान्सपोर्ट असोसिएशनने याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जिल्हाधिकारी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत निवेदन देऊन पार्किंगसाठी जागेची मागणी केली आहे. पण जागाच नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे.
---------------------
* काय करायला हवे *
* सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत सांगली फाटा येथे वाहतूक नियंत्रकांची संख्या वाढवणे
* महामार्गालगत असणाऱ्या हॉटेलसमोर रात्री साडेसात ते साडेदहा या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केलेली असतात. त्यामुळे या वेळेत महामार्ग आणि शिरोली पोलिसांनी पेट्रोलिंगच्या फेऱ्या वाढवाव्यात
* ज्या हॉटेलमुळे महामार्गावर पार्किंग होते अशा हॉटेल व्यवसायिकांवरही कारवाई होणे आवश्यक
* औद्योगिक वसाहतीमध्ये उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्याखाली रिकामी जागा वाहन पार्किंगसाठी उपलब्ध करून देता येऊ शकते का? यावर विचार व्हावा.
* औद्योगिक वसाहतीमध्ये वापरात नसलेले भूखंड औद्योगिक विकास महामंडळाने ट्रक पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावेत.
-------------------------
शिरोली हा इंडस्ट्रियल एरिया आहे. त्यामुळे मालाची वाहतूक करण्यासाठी वाहने लागतात. हे गृहीत धरून औद्योगिक विकास महामंडळाने वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महामार्गाच्या सहा पदरीकरणानंतर हा प्रश्न अधिकच गंभीर बनणार आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून सर्व वाहन चालकांना महामार्गावर पार्किंग करू नये अशा सूचना दिल्या आहेत.
-कुलभूषण कोळी,
अध्यक्ष, नागाव-शिरोली ट्रान्सपोर्ट असोसिएशन
--------------------
पोलिसांच्यावतीने पेट्रोलिंग सुरू असताना महामार्गावर चुकीच्या पद्धतीने वाहने पार्किंग केलेली आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. पण अपुऱ्या मनुष्यबळामुळे पेट्रोलिंगमध्ये नियमितता ठेवता येत नाही. अशावेळी काही समस्या निर्माण होतात. मात्र महामार्ग पोलिस आणि शिरोली एमआयडीसी पोलिस यावर एकत्रित काम करून याचा बंदोबस्त करता येईल. यासंदर्भात वरिष्ठांचेही मार्गदर्शन घेऊ.
-सागर पाटील,
सहाय्यक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT