कोल्हापूर

पंधरावा वित्त आयोग आणि जलजीवन योजनेवरुन शियेची ग्रामसभा वादळी

CD

शियेची ग्रामसभा वादळी
पंधरावा वित्त आयोग, जलजीवन योजनेवरून वाद
सकाळ वृत्तसेवा
शिये, ता. १६ : पंधरावा वित्त आयोग आणि जलजीवन योजनेवरून शियेची विशेष ग्रामसभा वादळी ठरली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीतल मगदूम या होत्या. छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक विलास जाधव व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
पंधराव्या वित्त आयोगाच्या कामात गैरव्यवहार झाल्याने भविष्यातील विकासकामांचा आराखडा तयार करताना ग्रामस्थांना विश्‍वासात घ्यावे व तसा ठराव करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. याला उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाजीराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला.
ग्रामविकास अधिकारी नीलेश कुंभार यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक विषयावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून प्रश्‍न विचारण्यात आले.
घर फाळ्याच्या विषयावर भाजपचे अक्षय पाटील यांनी अपात्र सदस्याचा थकीत फाळा भरलेला नसताना रजिस्टरला फाळा भरला असल्याची नोंद कशी आणि विशेष म्हणजे संबंधित सदस्याला न्यायालयीन कामासाठी तसा दाखलाही देण्यात आला या घटनेकडे लक्ष वेधले. संबंधित सदस्यावर फौजदारी दाखल करा; अन्यथा सर्व ग्रामस्थांचा थकीत घर फाळा माफ करा, अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंधराव्या वित्त आयोगातील झालेला भ्रष्टाचारास सर्व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाचे खंडन करत ग्रामपंचायत सदस्य विश्‍वास पाटील व उपसरपंच प्रभाकर काशीद यांनी केला.
जलजीवन मिशन योजनेची कागदपत्रे योग्य रीतीने झाली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला. यावर जयसिंग पाटील यांनी सदर योजनेचे प्रोसिडिंग व कागदपत्रे हे रीतसर पद्धतीने झाली असल्याचे सांगितले. तरीही संबंधित योजनेचे कॉन्ट्रॅक्टर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन योजना राबवायची की बंद करायची याचा निर्णय घेऊया असे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी सांगितले.
या वेळी हनुमान विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष जयसिंग काशीद, माजी सरपंच रणजित कदम, अॅड. माणिक शिंदे, लक्ष्मण काशीद, उत्तम पाटील, सतीश कुरणे, मच्छिंद्र मगदूम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT