02910
...
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
हालोंडी फाटा येथे अपघातः पाठीमागून जोराची धडक
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २८ : भरधाव मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. भरत बाळासो परीट ( वय ४०, रा. हालोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. कोल्हापूर - सांगली महामार्गावरील हालोंडी फाटा येथे आज दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भरत परीट हा मौजे वडगाव फाट्यावरील एका इलेक्ट्रिकल्समध्ये कामास होता. दुसऱ्या शिफ्टमध्ये कामावर जायचे असल्याने दुपारी चारच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. मोटरसायकलवरून कामावर जात असताना कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने परीट याच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकल सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. तर मोटारसायकलस्वार भरत परीट हा उडून डांबरी रस्त्यावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघातामुळे मोटारीच्या दोन्ही बाजूच्या एअर बॅग उघडल्याने मोटारीतील चालकासह प्रवासी बचावले. अपघाताची माहिती मिळताच हालोंडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, भरत परीट हा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला आणि अवघ्या दोन मिनिटात त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.