कोल्हापूर

शियेत श्री राम मंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा उत्साहात

CD

02979

मंगल अक्षता कलशाचे शियेत स्वागत
शिये : शिये (ता. करवीर) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. अयोध्यातून रामलल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मंगल अक्षता कलशाचे गुरुवारी सायंकाळी शियेत आगमन झाले. प्रभू रामचंद्र प्रतिमा व मंगल कलशाचे सरपंच शीतल मगदूम, कारसेवक निवास पाटील व शिवाजी बुवा यांनी पूजन केले. टाळ-मृदंगाच्या गजरात अक्षता कलशाची पालखी निघाली. पालखी मार्गावर रांगोळी काढली होती. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत दर्शन घेतले. मंगलकलश पालखी हनुमाननगर, श्री रामनगर, शिवाजीनगर, विठ्ठलनगर, माळवाडी परिसरातून प्रदक्षिणा घालत गावभागात पोचली. पालखी सोहळा गावात आल्यानंतर करवीर तालुका संघचालक शशिकांत पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. पाच तास चाललेल्या पालखी सोहळ्याची सांगता ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरतीने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Sahyadri : जंगलांची कत्तल सुरूच! सह्याद्रीतील वनक्षेत्र घटल्याने जैवविविधतेचा गंभीर इशारा

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजपची साथ सोडणार?

New Year Party Dress: न्यू इयर पार्टीत सर्वांपेक्षा वेगळं दिसायचंय? ट्राय करा हे स्टायलिश बॉडीकॉन ड्रेस!

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT