कोल्हापूर

शिरोली औद्योगिक वसाहतीमधील श्री दत्त फौंडर्स अँड इंजिनिअर कंपनीला आग

CD

B03188
शिरोली : औद्योगिक वसाहतीमधील श्री दत्त फाउंडर्स अॅण्ड इंजिनिअर्स कंपनीला लागलेल्या आगीमुळे उठलेले धुराचे लोट.

शिरोली एमआयडीसीतील
श्री दत्त फौंडर्सला आग

सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २५ : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील श्री दत्त फौंडर्स अँड इंजिनिअर प्रा. लि. या कंपनीला अचानक आग लागली. आज सायंकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या या आगीत कंपनीचे तीन मजली कार्यालय जळाले. यामध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कोल्हापूर महपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग वेळेत आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. कंपनीच्या आवारात असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वर्षापूर्वीच कंपनीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. सीआय आणि एसजी कास्टिंग उत्पादनात कार्यरत या कंपनीच्या आफिसजवळ अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी पळत बाहेर आले.
दरम्यान कोल्हापूर महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पाणीपुरवठा करणारे काही स्थानिक टँकरचालक टँकरसह घटनास्थळी आले. त्यामुळे आग वेळेत आटोक्यात आली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याबाबत कंपनीच्या वतीने कोणतीही फिर्याद देण्यात आलेली नव्हती
दरम्यान, शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे स्वतःचे फायर स्टेशन असावे अशी खूप वर्षांपासूनची मागणी आहे. पण, औद्योगिक महामंडळाने उद्योगांनाच फायर सेफ्टीसाठी स्वतःचे फायर स्टेशन विकसित करण्याची अट घातली आहे. आणि महापालिकेच्या अग्निशमन दलास वाहतूक कोंडीचा सामना करत वेळेत पोहचण्यासाठी कसरत करावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT