कोल्हापूर

पंचगंगेचे पात्र जलपर्णीने आच्छादले

CD

03201
पंचगंगेचे पात्र भरले जलपर्णीने
शिरोलीजवळ चित्र : जलचरांना धोका
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १ : पंचगंगा नदीपात्रात पुलाची शिरोली येथील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून राहिल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने आच्छादले आहे. यामुळे अन्य जलजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच पाणी प्रदूषणाचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी पंचगंगा नदीवर असणारा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल उतरवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता नवीन पूल उभा राहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नदी पात्रात भराव आहे. शिवाय याच ठिकाणी नदीपात्र थोडे उथळ आहे. परिणामी जलपर्णी तेथे अडकून राहिली आहे. कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यासह अनेक छोटे मोठे सांडपाण्याचे नाले थेट पंचगंगा नदी पात्रात मिसळत आहे. यामुळे जलपर्णीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणजे पंचगंगेचे पात्रच जलपर्णीने आच्छादले आहे. लवकरच यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. अन्यथा अन्य जलजीवांना आवश्यक सुर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. आणि नदी पात्रातील पाणी दुर्गंधीयुक्त होऊन नदी पात्रावर अवलंबून ग्रामीण पाणी पुरवठा योजना संकटात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT