कोल्हापूर

विनापरवाना घोडागाडी शर्यतीप्रकरणी पुलाची शिरोली सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा

CD

पुलाची शिरोलीच्या सरपंचांसह सदस्यांवर गुन्हा

विनापरवाना घोडागाडी शर्यतीप्रकरणी कारवाई

नागाव, ता. १४ : विनापरवाना घोडागाडी शर्यतीप्रकरणी पुलाची शिरोलीचे सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिरोली येथील उरूस व यात्रेनिमित्त या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. घोडागाडी शर्यतीत घोड्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. शिवाय शर्यतीत धावणारा एक घोडा पाय घसरून पडल्यामुळे घोडागाडी उलटली. त्यामुळे घोडागाडीपाठोपाठ मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या‍ शौकिनांपैकी दोघे मोटारसायकलस्वार जखमी झाले.
याबाबत प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. त्यानुसार विनापरवानगी घोडागाडी शर्यती घेतल्याप्रकरणी शिरोली पोलिस ठाण्यात उरूस व यात्रा कमिटीच्या विरोधात आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुलाची शिरोलीत उरूस व यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्यावतीने इचलकरंजी प्रांताधिकारी यांची परवानगी घेऊन बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या. पण, त्यानंतर काही घोडा शौकिनांनी घोडागाडी शर्यती घेतल्या. या शर्यतीसाठी प्रांताधिकारी इचलकरंजी यांची परवानगी घेण्यात आली नव्हती.
या शर्यतीवेळी घोड्यांना लोकांकडून निर्दयपणे वागणूक व अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तसेच घोड्याचा पाय घसरून दोन घोडागाड्यांचा अपघात झाला. या अपघातात घोडी व संदीप तात्यासो संकपाळ हा मोटारसायकलस्वार जखमी झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्याअनुषंगाने आज सकाळी कोल्हापूर येथील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. सायंकाळी साडेचार वाजता करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी शिरोली पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तपासात घोडागाडी शर्यतीची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस कर्मचारी नीलेश मच्छिंद्र कांबळे यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT