कोल्हापूर

अनधिकृत खोक्यांविरुद्ध उद्यापासून एमआयडीसीची विशेष मोहीम ; वसाहतींमधील वाहतूक कोंडी, अवैध व्यवसायला चाप बसणार

CD

अनधिकृत खोक्यांविरुद्ध उद्यापासून
एमआयडीसीची विशेष मोहीम

नागाव, ता. ८ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील विद्रुपीकरण आणि अनधिकृत खोक्यांविरुद्ध प्रशासनाने कंबर कसली आहे. एमआयडीसीमधील रस्ते आणि मोकळ्या जागांवर फोफावलेली अनधिकृत खोकी हटवण्यासाठी उद्यापासून एक विशेष अतिक्रमण हटाव मोहीम'' राबवण्यात येणार आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
औद्योगिक वसाहतींमध्ये प्रवेशाच्या मुख्य रस्त्यांवर आणि मोक्याच्या जागांवर अनधिकृत खोकी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. एमआयडीसीच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अनेकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून ही खोकी उभारली आहेत आणि ती दुसऱ्यांना भाड्याने देऊन त्यातून आर्थिक लाभ उठवला जात आहे. या खोक्यांमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे औद्योगिक क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. ज्या व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून रीतसर परवानगी घेऊन, परवाना शुल्क भरून अधिकृत जागेत आपले व्यवसाय सुरू केले आहेत, त्यांना या अनधिकृत खोक्यांमुळे मोठा फटका बसत आहे. अनधिकृत धारकांमुळे अधिकृत गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने, प्रशासनाने ही कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारताच काही खोकी धारकांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडे एमआयडीसी मधील उद्योजकांनी ही खोकी तात्काळ हटवण्याची मागणी लावून धरली आहे. एमआयडीसीचे पथक, पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करणार आहे. यामुळे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल, आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोट

एमआयडीसीचे विद्रुपीकरण, प्रवेशाच्या मुख्य रस्त्यांवर आणि मोक्याच्या जागांवर होणारी वाहतुकीची कोंडी आणि खोक्यांमध्ये अनेक ठिकाणी चालणारे अवैध व्यवसाय यामुळे ही मोहीम गरजेची आहे.
- आय. ए. नाईक, कार्यकारी अभियंता, औद्योगिक विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT