02162
तिरंगा मंडळाचा प्रतापगड
किल्ला स्पर्धेत प्रथम
नानीबाई चिखली ः येथील डायमंड ग्रुपतर्फे दीपावलीनिमित्त माझा किल्ला, माझी संस्कृती, माझा अभिमानअंतर्गत भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत तिरंगा तरुण मंडळाच्या मुलांनी बनविलेल्या प्रतापगड किल्ल्यास प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेमध्ये १९ मंडळांनी सहभाग घेतला. लहान मुलांना बालवयातच प्रगल्भ, गौरवशाली इतिहास माहीत व्हावा, इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा या हेतूने डायमंड ग्रुपतर्फे स्पर्धा भरविण्यात येतात. स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.
शिव-बसव मंडळाचा अजिंक्यतारा यास द्वितीय, एस. सी. बॉईज मंडळाचा पन्हाळगड, विशाळगड यास तृतीय तर शुभम पवार याने बनवलेला दातेगड उत्तेजनार्थ ठरला. विजेत्यांना रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. वसीम सय्यद यांनी प्रास्ताविक केले. व्याख्याते वसंत हंकारे, सरपंच अल्लाबक्ष सय्यद, उपसरपंच विजय घस्ती यांच्याहस्ते बक्षीसे देण्यात आली. सुनील मार्तंड, रामदास कुंभार यांनी परीक्षक म्हणून काम केले. यावेळी रवींद्र कस्तुरे, युवराज कुंभार, कुमार संकपाळ, वैभव गळतगे, पांडुरंग गळतगे तसेच डायमंड ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.