2607
अर्जुननगर ः येथील देवचंद कॉलेजमध्ये झालेल्या आंतरविभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बाबासाहेब चितळे महाविद्यालय (भिलवडी) संघाला पारितोषिक देताना प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे. शेजारी इतर मान्यवर.
...............
चितळे महाविद्यालय प्रथम
आंतरविभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा ः ११ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. २२ ः शिवाजी विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरविभागीय महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी (जि. सांगली) संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयाच्या संघाचा दोन विरुद्ध एक गुणाने पराभव केला. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ११ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धा अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजच्या मैदानावर झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन देवचंदच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी डॉ. स्वप्नील पाटील, प्रा. रमेश पाटील, डॉ. राहुल इंगळे, शिवाजीराव पोवार, डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. विकास जाधव, प्रा. काशिनाथ वनमोरे, प्रा. स्मीता जगताप उपस्थित होते.
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात देवचंद कॉलेजने विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर संघाचा २-१ ने पराभव केला. पारितोषिक वितरण प्राचार्या इंगळे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या संगीता जाधव, पर्यवेक्षक डॉ. अशोक डोनर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पंच म्हणून अनिल देवडकर, प्रवीण मोरबाळे, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, दत्ता ढेंगे, चंद्रकांत कासोटे, संग्राम तोडकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह यांचे प्रोत्साहन लाभले. संयोजकप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. भालचंद्र आजरेकर, दयानंद अणुसे, वैभव सोनार यांचे स्पर्धा यशस्वितेसाठी सहकार्य लाभले. डॉ. सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर गुरव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.