कोल्हापूर

योजनांमुळे बांधकाम कामगारांना ‘अच्छे दिन’

CD

2898
नानीबाई चिखली ः येथे घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेले बांधकाम.
.......
योजनांमुळे बांधकाम कामगारांना ‘अच्छे दिन’

कागल तालुक्यात तीन हजार नव्या घरांचे बांधकाम सुरू ः काही ठिकाणी मजूर टंचाई

रमजान कराडे ः सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. २३ ः कागल तालुक्यात बांधकाम क्षेत्रात तेजी आल्याने गवंडी, सेंट्रिंग कामगारांसह बांधकाम क्षेत्राशी संबंधित अनेकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शासकीय योजनांतर्गत आणि खासगी विकास प्रकल्पातून तालुक्यात सुमारे तीन हजार नव्या घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. गावागावांतील बांधकामांमुळे कामगारांना उसंत मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.
सामान्य माणसांना, बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकारकडून घरकुल योजना राबविली जात आहे. यासाठी लाभार्थी निवडून त्यांना केंद्र, राज्य शासनाकडून एकत्रित अनुदान दिले जाते. कागल तालुक्यात सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना तसेच अन्य शासकीय गृहनिर्माण योजनांसोबतच शहर आणि ग्रामीण भागात वैयक्तिक घरबांधणी प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
बांधकामातील गवंडी, सेंट्रिंग हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्याशिवाय बांधकामे पूर्ण होऊ शकत नाहीत. सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील बांधकामांमुळे कामगारांना चांगला रोजगार मिळत आहे. बांधकामातील तेजीमुळे गवंडी, सेंट्रिंग नव्हे तर प्लंबर, इलेक्ट्रिशियन, फरशी फिटिंग करणारे, सुतार, लोहार, फॅब्रिकेशन, पेंटर यांसारख्या कुशल, अर्धकुशल कामगारांना यानिमित्ताने भरघोस कामे मिळू लागली आहेत. काही ठिकाणी कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने काही बांधकामे पुढे ढकलली आहेत, तर काही ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यांतून कामगारांना बोलावून कामे दिली जात आहेत.
गावागावांतील बांधकामांमुळे बांधकाम कामगार नव्हे तर बांधकामाशी संबंधित व्यावसायिक जसे की वीटभट्टी कामगार, सिमेंट, स्टील, वाळू, खडी, फरशी विक्रेते तसेच वाहतूकदार यांनाही फायदा होत आहे. बांधकाम क्षेत्रातील ही सकारात्मकता तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत आहेत.
.....
चौकट...
प्रधानमंत्री आवासची २०४३ कामे सुरू
कागल तालुक्यात २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट ५२२८ आहेत. त्यापैकी ५१७३ मंजूर आहेत, तर प्रत्यक्षात २०४३ बांधकामे सुरू आहेत. मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट ९२५ असून, मंजूर ६०५ आहेत. यातील ३९३ बांधकामांना निधी नसल्याने काम सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट ११५ असून ११५ मंजूर आहेत. त्यांचे बांधकामही लवकरच सुरू होईल. याशिवाय ‘सुंदर माझे घरकुल’ अभियानांतर्गत तालुक्यात शंभर दिवसांत घरकुल पूर्ण केलेली संख्या ११९ आहे; जी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
.....
कोट....
घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय तालुकास्तरावरून पालक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. लवकरच तालुक्यात घरकुल लाभार्थी संवाद अभियान सुरू होणार असून, लाभार्थ्यांच्या अडचणी त्यांच्या दारात जाऊन सोडविण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकाम सुरू करून घरकुल पूर्ण करावे यासाठी प्रयत्नशील आहे.
- कुलदीप बोंगे, गटविकास अधिकारी, कागल
..........
कोट....
गेल्या काही वर्षांत कामांची फारशी संधी मिळाली नव्हती; परंतु सध्या दररोज नवीन गृह प्रकल्प सुरू होत असून, कामगारांची मागणी वाढली आहे. घरबांधणी प्रकल्पांमुळे रोजगार मिळाल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित सुधारू लागले आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.
- शबीर आणुरे, गवंडी व प्लंबर, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT